न्यूयॉर्क, 20 जून: मध्य पूर्व आशियात पुन्हा एकदा युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव प्रचंड वाढले आहेत. यात आता चक्क अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला गंभीर इशारा दिला आहे. ट्टविवरून दिलेल्या या इशाऱ्यानंतर युद्ध होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. तेहरानने खुप मोठी चुक केली आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यावर इराण (Iran)च्या लष्कर प्रमुखांनी देखील आमचे लष्कर युद्धासाठी तयार असल्याचे जाहीर करत अमेरिकेला आव्हान दिले आहे. दोन्ही बाजूंनी सुरु झालेल्या या वाक्य युद्धामुळे मध्य पूर्व आशियावर युद्धाचे ढग जमा झाल्याचे बोलले जात आहे.
गुरुवारी ट्रम्प यांनी ट्विटवर म्हटले की, इराणने एक मोठी चुक केली आहे. ट्रम्प यांच्या या ट्विटकडे सर्वजण गांभिर्याने घेत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे हेरगिरी करणारे ड्रोन पाडले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे अमेरिका मोठी कारवाई करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेडून इराणवर आर्थिक निर्बंध लादले जाऊ शकतात. याआधीच इंधनाच्या टँकवर झालेल्या हल्ल्यामुळे या क्षेत्रात तणावाचे वातावरण आहे. त्यातच इराणकडून करण्यात आलेल्या आक्रमक कारवाईमुळे अमेरिका नाराज झाली आहे.
याआधी इराणच्या इस्लामिक रेव्हूरेशनरी गार्ड कॉर्प्सने देशाच्या हवाई हद्दीत प्रवेश करणाऱ्या अमेरिकेचे एक डोन पाडले होते. अर्थात त्यानंतर अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असलेल्या पेंटागनने ही घटना आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत झाल्याचा दावा केला होता.
Iran made a very big mistake!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) June 20, 2019
...यामुळे अमेरिका भडकली
इराणने अमेरिकेचे MQ-4C ट्राइटन ड्रोन पाडून थेट आव्हान दिले. इतक नव्हे तर अमेरिकेसाठी हा प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे. कारण हे ड्रोन सर्वात आधुनिक आणि शक्तिशाली होते. त्यामुळे अमेरिकेसाठी ही लाजीवाणी गोष्ट ठरली आहे. 2032पर्यंत MQ-4C प्रकारचे 32 ड्रोन ताफ्यात घेण्याचा अमेरिकेचा विचार आहे. या ड्रोनचे वैशिष्टे म्हणजे हे 30 तास 56 हजार फुटावरून उड्डण करु शकते. यातील जबरदस्त लेसरमुळे फुल मोशन व्हिडिओ रेकॉर्ड करता येतात. तसेच लक्ष्याचा अचूक वेध घेता येतो. या ड्रोनमध्ये रॉल्स रॉईसचे इंजिन वापरण्यात आले असून ते 50 फूट लांब आहे. याच्या पंखाची लांबी 130 फुट इतकी आहे. प्रती तास 368 मैल इतक्या वेगाने MQ-4C प्रवास करू शकते.
ड्रोन पाडण्यात रशिया कनेक्शन...
अमेरिकेचे ड्रोन पाडण्यात रशियाचे कनेक्शन देखील समोर आले आहे. MQ-4C ड्रोन कोणत्याही साध्या मिसाईलद्वारे पाडता येत नाही. त्यासाठी दमदार रडारद्वारे नियंत्रित होणारे मिसाईल हवे. यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इराणकडे रशियाकडून मिळालेली S-300 सिस्टिम आहे. S-300 द्वा्रेच अशा प्रकारचे ड्रोन पाडता येते. असे म्हटले जाते की याच कारणामुळे अमेरिका अधिक भडकली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे MQ-4C ट्राइटन ड्रोन प्रथमच एखाद्या देशाने पाडले आहे. याआधी कोणालाही हे ड्रोन पाडता आले नाही आणि रशियाच्या मदतीने इराणने हे धाडस केल्यामुळे अमेरिकेला अधिक राग आला आहे.
VIDEO : नववधूला घेऊन पती गेला दर्शनाला, पण ती प्रियकरासोबत पळाली