युद्धाचे संकेत? अमेरिकेचं ड्रोन पाडलं, इराणचा दावा

युद्धाचे संकेत? अमेरिकेचं ड्रोन पाडलं, इराणचा दावा

America - Iran Relation : इराण आणि अमेरिकेचे संबंध सध्या कमालीचे ताणले गेले आहेत.

  • Share this:

तेहरान, 20 जून : अमेरिका – इराणमधील संबंध सध्या कमालीचे ताणले गेले आहेत. अशा वेळी इराणनं अमेरिकेचं ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. इराणच्या या दाव्यामध्ये तथ्य असल्यास पुढील काही तास हे दोन्ही देशांमधील संबंधांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहेत. इराणनं अमेरिकेचं RQ-4 Global Hawk ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. तर, दुसरीकडे इराणच्या हवाई हद्दीत कोणतंही अमेरिकी ड्रोन गेलं नसल्याचा दावा अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी केला आहे. सध्या दोन्ही देशांमधील संबंध हे कमालीचे ताणले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी जपानी तेल टँकरवर देखील हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याकरता वापरण्यात आलेली स्फोटकं ही इराणच्या स्फोटकांशी मिळती – जुळती असल्याचा दावा अमेरिकेनं केला होता. पण, इराणनं मात्र अमेरिकेच्या या दाव्याचा इन्कार केला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये संबंध हे ताणले गेले आहेत. इराण आणि अमेरिकेमध्ये शाब्दीक युद्ध देखील रंगल्याचं पाहायाला मिळत आहे.

घराणेशाहीला रामराम ! गांधी कुटुंबाबाहेरील 'हा' नेता होणार नवा काँग्रेस अध्यक्ष?

अमेरिकेनं दिले पुरावे

जपानी तेल टँकरवर झाल्याच्या पुराव्यादाखल अमेरिकेच्या नौदलानं काही चुंबकाचे तुकडे देखील सादर केले. त्यांनी याचा संबंध इराणशी असल्याचं म्हटलं आहे. पण, इराणनं अमेरिकेचा हा दाव देखील फेटाळून लावला.

मध्य पूर्वमध्ये तणाव

सध्या मध्य पूर्वमध्ये तणाव आहे. इराणकडून तेल खरेदी करू नये यासाठी अमेरिका इतर देशांवर देखील दबाव टाकत आहे. अमेरिकेनं भारतावर देखील दबाव टाकला. अशाच प्रकारचा दबाव हा अमेरिका इतर देशांवर देखील टाकताना दिसत आहे.

तेल उत्पन्नातील इराण महत्त्वाचा देश

सौदी अरेबियानंतर इराण हा सध्या तेल उत्पान्नातील महत्त्वाचा देश आहे. भारताला तेल पुरवठा करणाऱ्या देशांपैकी इराणचा वाटा हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे. पण, सद्या मात्र अमेरिकेनं इराणकडून होणाऱ्या तेल आयातीवर निर्बंध घातले आहेत.

सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार? इथे जीव धोक्यात घालून करतायत प्रवास

First published: June 20, 2019, 1:54 PM IST

ताज्या बातम्या