माजी IPS अधिकाऱ्याला 30 वर्ष जुन्या प्रकरणात झाली जन्मठेप

माजी IPS अधिकाऱ्याला 30 वर्ष जुन्या प्रकरणात झाली जन्मठेप

IPS अधिकारी असलेल्या भट यांनी थेट नरेंद्र मोदींवरच आरोप केल्याने त्या काळात ते चांगलेच गाजले होते.

  • Share this:

अहमदाबाद, 20 जून :  वादग्रस्त माजी IPS अधिकारी संजीव भट यांना जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. गुजरातमधल्या जामनगरच्या न्यायालयाने त्यांना आज ही शिक्षा सुनावली. पोलीस कोठडीत झालेल्या एका मृत्यू प्रकरणात भट यांना ही शिक्षा झाली. 1990मधलं हे प्रकरण असून गेली अनेक वर्ष हा खटला सुरू होता. भट या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. गुजरातच्या 2002च्या दंगलीनंतर भट यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपामुळे देशभर चर्चेत आले होते.

पोलीस अधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांवरच आरोप केल्याने संजीव भेट त्या काळात चांगलेच गाजले होते. राज्यात उसळलेल्या दंगलीला मोदीच जबाबदार आहेत असा त्यांचा आरोप होता. त्यानंतर मोठा वादही निर्माण झाला. राज्य सरकारने भट यांच्याविरुद्ध विविध चौकशींचं शुक्लकाष्ठ लावलं. भट यांनीही मोदींवर अनेक बेछुट आरोप केलेत.

या भांडणाचा परिणाम म्हणजे संजीव भट यांना सरकारने बेशिस्तीच्या प्रकरणावरून 2015मध्ये निलंबित केलं. नंतर भट यांनीही कोर्टात अनेक वर्ष लढाया दिल्या.

काय आहे प्रकरण?

नोव्हेंबर 1990मध्ये प्रभुदास माधवजी वैश्नानी या व्यक्तिचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. भारत बंदच्या दरम्यान दंगल प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. अटेकत असताना पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी संजीव भेट हे जामनगरचे सहाय्यक पोलीस अधिक्षक होते. 9 दिवसानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली होती.

सुटका झाल्यानंतर 10 व्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. किडण्या फेल झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टेम अहवालात म्हटलं गेलं. या विरुद्ध त्यांचे नातेवाईक कोर्टात गेले. 1995मध्ये भट आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलं. मात्र 2011 पर्यंत काहीच कारवाई झाली नाही. गुजरात हायकोर्टानं त्यावर स्थगिती दिली होती. नंतर ही स्थगिती उठविण्यात आली होती.

राज्य सरकारने जाणीवपूर्वक कारवाई केली असा आरोप संजीव भट यांनी केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2019 04:34 PM IST

ताज्या बातम्या