खरा हीरो! तब्बल 40 हजार लोकांसाठी हे मराठी IPS अधिकारी झाले देवदूत

खरा हीरो! तब्बल 40 हजार लोकांसाठी हे मराठी IPS अधिकारी झाले देवदूत

कोरोनाविरुद्धच्या लढाईत मूळ नगरचे आणि सध्या तेलंगणात पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले आयपीएस महेश भागवतांचे नाव चर्चेत आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मे : देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान चालू आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कामधंदे उद्योग बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मजुरांचे होणारे हाल आणि त्याची अवस्था दाखवणारे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांना मदत सरकारसह अनेक स्तरांवरून मदत करण्यात आली. पण मराठमोठ्या IPS अधिकाऱ्यानं आपल्या राज्यातील मजूर आणि वृद्धांची काळजी खूप काळजी घेतली. या IPS अधिकाऱ्याला तेलंगणामध्ये अन्नदाता म्हणूनही ओळखलं जातं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे. या काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली. महेश भागवत हे अक्षरश: देवदूत बनून या लोकांच्या मदतीला आहे. तेलंगाणातील 41 वृद्धाश्रम त्यांनी दत्तक घेतलेत. तेथील 1 हजार 600 वृद्धांच्या जेवणाची सोयही ते करत आहेत. निराधार 20 हजरा आणि 40 हजार मजुरांच्या अन्नाची सोय त्यांनी केली. यासोबत या मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाता यावी यासाठी पुढाकार घेऊन त्यांनी मदत केली आहे.

कोण आहेत IPS महेश भागवत

मूळचे नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे महेश भागवत IPS अधिकारी म्हणून सध्या तेलंगणा इथे कार्यरत आहेत.

मणिपूर-त्रिपुरा केडरमध्ये इंफाळला सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून पहिली नेमणूक झाली होती.

आंध्रप्रदेश केडरमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

आंध्रप्रदेश मधील आदीलाबाद येथे SP म्हणून नियुक्ती झाली. नक्षलग्रस्त असणारा हा भाग, येथील चार वर्षाच्या काळात १४५ नक्षलवादी शरण आले तेही कोणताही बळाचा वापर न करता.

मानवी तस्करीच्या विरूद्ध जो लढा उभारला त्याची दखल अमेरिकेलाही घ्यावी लागली. यासाठी अमेरिकेच्या गृहखात्याने त्यांना ‘2017 ट्रॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हिरोज अॅवार्ड’ हा प्रतिष्ठेचा सन्मान दिला.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 27, 2020, 3:25 PM IST

ताज्या बातम्या