Home /News /national /

IPS ऐश्वर्या डोंगरेंनी पोलीस स्टेशनमध्येच कर्मचाऱ्यांची घेतली शाळा; एका महिला कॉन्स्टेबलला तर...

IPS ऐश्वर्या डोंगरेंनी पोलीस स्टेशनमध्येच कर्मचाऱ्यांची घेतली शाळा; एका महिला कॉन्स्टेबलला तर...

दबंग अधिकारी म्हणून ऐश्वर्या डोंगरे यांचं नाव घेतलं जातं.

    कोच्ची, 15 जानेवारी : केरळमधील (Kerala) कोच्ची येथील डेप्युटी पोलीस कमिश्नर ऐश्वर्या डोंगरे (Aishwarya IPS) यांनी पोलीस स्टेशनमधील सुरक्षेसाठी तैनात एका महिला कॉन्स्टेबलला शिक्षा सुनावली आहे. पहिल्यांदाच येथे रुजू झालेल्या ऐश्वर्या यांनी दिलेल्या शिक्षेवरुन मोठा गदारोळ माजला आहे. (IPS Aishwarya Dongre replaced a female constable as a punishment ) अनेकांनी या शिक्षेचा निषेध केला आहे. महिला कॉन्स्टेबलला त्यांनी शिक्षा म्हणून वाहतूक पोलिसांच्या ड्यूटीवर पाठवलं आहे. काय आहे प्रकरण? महिला पोलीस कॉन्स्टेबल केरळमधील कोच्चीच्या नार्थ टाऊन पोलीस स्टेशनमध्ये मुख्य गेटवरील सुरक्षेसाठी तैनात होती. दरम्यान या वर्षीच्या पहिल्या तारखेपासून आपला पदभार सांभाळणाऱ्या ऐश्वर्या या फॉरमल कपड्यांवर पोलीस स्टेशनचं निरीक्षण करावयास आल्या होत्या, तेव्हा महिला पोलीस त्यांना ओळखू शकली नाही. यामुळे आयपीएस ऐश्वर्या डोंगरे नाराज झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार त्यानंतर ऐश्वर्या यांनी त्या महिला कॉन्स्टेबलला सुनावले. त्या म्हणाल्या की, गेटवर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांची जबाबदारी सर्वाधिक असते. त्याला सर्वात जास्त सावध राहायला हवं. मात्र जेव्हा त्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या तेव्हा कॉन्स्टेबल अलर्ट नव्हत्या. यानंतर पोलीस असोसिएशनने हा मुद्दा उचलून धरला आणि महिला कॉन्स्टेबलला ड्यूटीवरुन हटवू नये अशी मागणी केली. याशिवाय ऐश्वर्या आयपीएस यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली. हा मुद्दा वाढत असल्याचं पाहून सिटी पोलीस कमिश्नर नागाराजू यांनी हस्तक्षेप केला. (IPS Aishwarya Dongre replaced a female constable as a punishment ) हे ही वाचा-...आणि बसमधील तो सेल्फी ठरला शेवटचा; 11 जणांच्या मृत्यूने मोदीही झाले भावुक! द इंडियन एक्सप्रेसच्या हवाल्याने आलेल्या बातमीनुसार सिटी पोलीस कमिश्नर नागाराजू यांनी महिला कॉन्स्टेबलच्या प्रकरणात आयपीएस ऐश्वर्या यांना चेतावणी दिली आहे. यापुढे अशी चूक करू नका, अशीही समज देण्यात आली. सिटी पोलीस कमिश्वर यांच्यानुसार आयपीएस ऐश्वर्या आता तरुण आहे आणि त्यांच्याकडे अनुभवाची कमी आहे. त्यातूनही अशी चूक झाली. मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या यांनी पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर आपली सरकारी गाडी पार्क केली होती आणि त्या फॉरमल्सवर आल्या होत्या. यामुळे कॉन्स्टेबल त्यांना ओळखू शकली नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या