Home /News /national /

IPL सामन्याचा सट्टा लावणाऱ्या 2 तरुणींसह 5 जणांना अटक; उच्चभ्रू इमारतीत सुरू होता ऑनलाइन धंदा

IPL सामन्याचा सट्टा लावणाऱ्या 2 तरुणींसह 5 जणांना अटक; उच्चभ्रू इमारतीत सुरू होता ऑनलाइन धंदा

भाड्याच्या फ्लॅटमधून IPL सामन्यांचा अवैधपणे सट्टाबाजार चालवणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोन तरुणी आणि 3 तरुण या प्रकरणी ऑनलाईन सट्टा लावल्याचा आरोप आहे.

    इंदोर, 9 ऑक्टोबर : IPL सामन्यांचा अवैधपणे सट्टा लावून त्यासाठी लोकांकडून ऑनलाईन पैसे घेत असलेल्या दोन तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याबरोबर इतर तिघे जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. इंदोर क्राइम ब्रँचने ही कारवाई केली आहे. इंदौरमधल्या उच्चभ्रू इमारतीमधल्या एका फ्लॅटमध्ये हा ऑनलाईन सट्ट्याचा धंदा काही जणांनी सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्याआधारे धडक कारवाई करत इंदोर क्राईम ब्रँचने पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींकडून 6 मोबाईल, 1 लॅपटॉप, 1 एलईडी. 2 रेड वाईनच्या बाटल्यांसह 10 लाखांहून अधिक रुपयांचा व्यवहार सुरू असल्याचे दस्तावेज पोलिसांना मिळाले आहेत. शिवाय साडेनऊ हजार रोख रुपयेसुद्धा त्यांच्याकडे मिळाले. इंदौर हौसिंग बोर्ड कॉलनीतल्या पिनॅकल ड्रीम्स या सोसायटीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये या पाच जणांचा अवैध धंदा सुरू होता. सौरभ रघुवंशी, जितेंद्र रघुवंशी, गौरी साकेत, प्रेरणा उप्पल, रवी नरवरिया अशी या पाच तरुणांची नावं आहेत. 2007 पासूनच हे तरुणांचं टोळकं ऑनलाईन सट्टाबाजारात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे पाच जण मूळचे इंदोरचे नसून गुना आणि जबलपूरचे रहिवासी आहेत. इंदौरमध्ये भाड्याच्या घरातून त्यांचा ऑनलाईन सट्ट्याचा व्यवसाय सुरू होता. या आरोपींच्या चौकशीतून सट्ट्याचं मोठं नेटवर्क उलगडण्याची शक्यता आहे. किंग्ज 11 पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्याचा ऑनलाईन सट्टा लावत असतानाच त्यांना अटक झाली. फोनवरून किंमत ठरवून ते सट्टा लावणाऱ्यांकडून पैसे ऑनलाइन अकाउंटला जमा करत होते.
    First published:

    Tags: Indore, IPL 2020

    पुढील बातम्या