आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची 3 जुलैपर्यंत अटक टळली

आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची 3 जुलैपर्यंत अटक टळली

विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी एअरसेल मॅक्सिस खटल्यात चिदंबरम यांना 3 जुलैपर्यंत अटक करू नये, असा आदेश सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिला.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना विशेष व दिल्ली उच्च न्यायालयाने एअरसेल मॅक्सीस व्यवहार व आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार खटल्यात बुधवारी मोठा दिलासा दिला.विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी एअरसेल मॅक्सिस खटल्यात चिदंबरम यांना 3 जुलैपर्यंत अटक करू नये, असा आदेश सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिला.

आयएनएक्स खटल्यात चिदंबरम यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालय गुरुवारी सुनावणी घेणार आहे. एअरसेल मॅक्सिसचा व्यवहार ३,५०० कोटी रुपयांचा तर आयएनएक्स मीडिया खटल्यात ३०५ कोटी रुपयांचा संबंध आहे. चिदंबरम हे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असताना विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचा हिरवा कंदिल वरील दोन्ही प्रकरणात दिला गेला होता. त्याच वेळी कथित गैरव्यवहार झाल्यामुळे चिदंबरम यांची त्यातील भूमिका चौकशी यंत्रणा तपासत आहेत.

First published: May 31, 2018, 2:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading