INX Media प्रकरण: 'पी.चिदंबरम यांच्या अटकेमुळे आनंद झाला'

INX Media प्रकरण: 'पी.चिदंबरम यांच्या अटकेमुळे आनंद झाला'

आयएनएक्स मीडिया (INX Media)प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम (P Chidambaram)यांच्या अटकेवर इंद्राणी मुखर्जी(Indrani Mukerjea)ने प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट: आयएनएक्स मीडिया (INX Media)प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम (P Chidambaram)यांच्या अटकेवर इंद्राणी मुखर्जी(Indrani Mukerjea)ने प्रतिक्रिया दिली आहे. गुरुवारी यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता मुखर्जी यांनी चिदंबरम यांच्या अटकेवर आनंद व्यक्त केला आहे. चिदंबरम यांना झालेली अटक ही एक चांगली बातमी आहे, असे मुखर्जीने म्हटले. आयएनएक्स मीडियाचे प्रमोटर इंद्राणी मुखर्जी आणि तिचे पती पीटर मुखर्जी(Peter Mukerjea) यांच्या दिलेल्या जबाबावरच ईडी आणि सीबीआयने चिदंबरम यांच्यावर कारवाई केली.

आयएनएक्स मीडियाच्या प्रमोटर इंद्राणी मुखर्जी सध्या मुलगी शीना बोराच्या हत्येप्रकरणी तुरूंगात आहे. या प्रकरणी चिदंबरम यांना 30 ऑगस्टपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. यासंदर्भात जेव्हा विचारण्यात आले तेव्हा इंद्राणीने मला आनंद झाला की चिदंबरम यांना अटक झाली. या प्रकरणावर माझी बारीक नजर आहे. त्याच बरोबर इंद्राणीने अशी अपेक्षा व्यक्त केली की कार्ति चिदंबरम यांची अटकपूर्व जामीनाची याचिका रद्द व्हावी.

ईडीच्या चौकशी दरम्यान इंद्राणीने सांगितले होते की, FIPBच्या मंजूरीच्या बदल्यात कार्ति चिदंबरमच्या व्यवसायात मदत करावी अशी अट पी.चिदंबरम यांनी पीटर मुखर्जीला घातली होती. ईडीने इंद्राणीच्या या जबाबावर आरोपपत्र दाखल केले आणि कोर्टात पुरावा म्हणून सादर केला. पीटर आणि क्रार्ति यांची भेट दिल्लीतील एका हॉटेलमध्ये झाली होती. या भेटीत कार्तिने हे प्रकरण निपटवण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागितली होती.

काय आहे हे प्रकरण?

15 मार्च 2007 रोजी INX Mediaने FIPBच्या मंजूरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे अर्ज केला होता. FIPBने 18 मे 2017 रोजी शिफारस केली होती. पण बोर्डाने INX Mediaद्वारे INX न्यूजमध्ये अप्रत्यक्ष गुंतवणूकीचे परवानगी दिली नाही. सीबीआयच्या मते INX Mediaने नियमांचे उल्लंघन करून जाणिपूर्वक INX न्यूजमध्ये 26 टक्के गुंतवणूक केली. इतक नव्हे तर 800 रुपये प्रती शेअर या हिशोबाने 305 कोटी गोळा केले. पण प्रत्यक्षात त्यांना 4.62 कोटी रुपयांच्या FDIची परवानगी होती.

'काट डालूंगा...' नगरसेवकाचा टिक टॉक VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 03:16 PM IST

ताज्या बातम्या