लखनऊ, 10 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये सध्या कशा पद्धतीनं गुंतवणूक सुरू आहे. नवी गुंतवणूक आणण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, आणि पंतप्रधान मोदींचं 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्तर प्रदेश कशापद्धतीनं योगदान देत आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. ते 'नेटवर्क 18' चे एडिटर -इन-चीफ राहुल जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होत्या. यावेळी योगींनी दिलेला शब्द खरा ठरला आहे. यावेळी योगी म्हणाले होते, उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणणार असून, आमच्याकडे उद्योग आणि शेती क्षेत्रामध्ये काम करण्याची मोठी संधी असल्याचं यावेळी योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले मुकेश अंबानी...
मुकेश अंबानी यांनी येत्या चार वर्षात उत्तर प्रदेशात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. या गुंतवणुकीतून १ लाख नवे रोजगार निर्माण होतील असा अंदाज आहे. लखनऊमध्ये आयोजित युपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, ५ वर्षांच्या आत उत्तर प्रदेश १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. २०२३ पर्यंत उत्तर प्रदेशातील सर्व शहरांमध्ये ५जी सेवा सुरू करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं.
नेमकं काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणणार आहे. आमच्याकडे उद्योग, आणि शेती क्षेत्रामध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. पुरसं मनुष्यबळ आहे. ग्लोबल समिटमध्ये आम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक आणणार आहोत. उत्तर प्रदेशचा विकास दर हा 13 ते 14 टक्के इतका आहे. देशातील 20 टक्के खाद्य उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये होते. गुंतवणुकीसाठी केंद्र आणि राज्य स्तारावर जोरदार प्रयत्न सुरू असून, रोजगार मिळवून देऊ शकतील असे अनेक क्षेत्र आमच्याकडे असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
6 वर्षांमध्ये 5 लाख रोजगार
पुढे बोलताना योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की मागील 6 वर्षांमध्ये आम्ही 5 लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या दिल्या आहेत. MSEM आणि विश्वकर्मा श्रम योजनेतून उत्तर प्रदेशातील 1 लाख 68 हजार लोकांना जोडलं. पंतप्रधान मुद्रा योजना, मुख्यमंत्री रोजगार योजना आणि इतर माध्यमातून 60 लाख लोकांना थेट व्यापाऱ्यांसोबत जोडता आलं. त्यामुळे राज्यात गुंतवणुकीचं प्रमाण वाढत असल्यचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.