नवी दिल्ली, 17 जुलै : भारत सरकारने तब्बल 90 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता फ्रान्स आणि अमेरिकेबरोबर एका द्विपक्षीय करारावर हस्ताक्षर करण्यात आले आहेत. यानुसार आता हे देश शुक्रवारपासून आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू करू शकतात. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी (Civil Aviation Minister Hardeep Singh Puri) यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी अशी माहिती दिली आहे की, यासारखे करार काही दिवसात जर्मनीबरोबर देखील करण्यात येतील. म्हणजे जुलै किंवा ऑगस्टपर्यंत या देशांसाठी फ्लाइट्स सुरू होतील.
येणाऱ्या काही दिवसात भारत आणि इंग्लंडदरम्यान दिल्ली-लंडन ही फ्लाइट दिवसातून दोन वेळा उड्डाण भरेल. त्याचप्रकारे जर्मनीमधील लुप्थांसा एअरलाइनबरोबरची चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे. भारताकडून फ्रान्स आणि अमेरिकेत एअर इंडियाची विमानं उड्डाण भरणार आहेत.
Our negotiations are at an advanced stage with 3 countries. Air France will operate 28 flights from July 18 to Aug 1 b/w Delhi, Mumbai, Bengaluru & Paris. US will be flying 18 flights b/w July 17-31 but this is an interim one. We have request from Germany too: Civil Aviation Min pic.twitter.com/J4olL7lPmT
18 जुलैपासून एअर फ्रान्स 28 आंतरराष्ट्रीय उड्डाणं दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि पॅरिसदरम्यान सुरू करणार आहे. अमेरिकेकडून युनायटेड एअरलाइन 18 आंतरराष्ट्रीय उड्डाणं 17 जुलै ते 31 जुलै दरम्यान सुरु करणार आहेत.
In an initiative to further expand our international civil aviation operations, air bubble arrangements with US, UAE, France & Germany are being put in place while similar arrangements are also being worked out with several other countries.
भारत सरकारने फ्रान्स आणि अमेरिकेबरोबर एक द्विपक्षीय करारावर हस्ताक्षर केले आहेत. यानुसार आजपासून हे देश आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करू शकणार आहेत. जगभरात कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण लक्षात घेता लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात देशातून आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद होती. 23 मार्चपासून देशात आंतरराष्ट्रीय उड्डाणं रोखण्यात आली होती. दोन महिन्यानंतर 25 मे पासून देशांतर्गत उड्डाणं सुरू करण्यात आली होती.