Home /News /national /

पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात करणार संबोधन, काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष

पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात करणार संबोधन, काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष

International Day of Vesak : बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं जगभरात होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आज सहभागी होणार आहेत.

    नवी दिल्ली, 07 मे : बुद्ध पौर्णिमा किंवा गौतम बुद्धांचा दिवस म्हणून जगभरात आजचा दिवस वेसाक (International Day of Vesak )दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 9 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. वेसाक दिनानिमित्तानं आज जनतेशी सकाळी 9 वाजता संवाद साधणार आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुऴे यंदा बुद्ध पौर्णिमा लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून जगभरात साजरी केली जाणार आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या स्मरणार्थ आणि कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांसाठी आजचा हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जगभरातील बौद्ध संघ सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जगभरातच नाही तर भारतातही कोरोनानं थैमान घातलं आहे. आतापर्यंत 33, 514 रुग्णांवर देशभरात उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे 1 हजार 694 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 14 हजार 182 जणांना कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वीपणे दिला असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे यंदा बुद्ध पौर्णिमेचा हा दिवस लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. हे वाचा-भारताचा COVID ग्राफ : लॉकडाऊन केल्यानंतर समोर आलेली आकडेवारी धक्कादायक पवित्र गार्डन लुम्बिनी (नेपाळ), महाबोधी मंदिर (बोधगया, भारत), मूलगंध कुटी विहार (सारनाथ), परिनिर्वाण स्तूप (कुशीनगर) आणि इतर ठिकाणांमधून प्रार्थना समारंभाचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण यांच्या स्मरणार्थ बुद्ध पौर्णिमेला 'वेसक डे' म्हणून साजरा केला जातो. हे वाचा-महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची टोपेंशी चर्चा संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, PM narendra modi

    पुढील बातम्या