कुलभूषण जाधव यांचे काय होणार? ICJच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष

कुलभूषण जाधव यांचे काय होणार? ICJच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष

कुलभूषण जाधव यांच्या संदर्भात भारताने दाखल केलेल्या याचिकेवर आज आंतरराष्ट्रीय न्यायालय निर्णय देणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जुलै: पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या संदर्भात भारताने दाखल केलेल्या याचिकेवर आज निर्णय देणार आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना एप्रिल 2017मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी भारताने हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) याचिका दाखल केली होती. भारताच्या या याचिकेवर 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान सुनावणी झाली होती. जर ICJचा निकाल जाधव यांच्या बाजूने लागला तर तो भारताचा एक मोठा विजय असले. ICJ आज संध्याकाळी 6.30च्या सुमारास निकाल देणार आहे. जाधव यांच्यासाठी भारत गेल्या दोन वर्षापासून लढात देत आहे. जाणून घ्या या भारताच्या या लढ्यासंदर्भातील सर्व अपडेट...

कोण आहेत कुलभूषण जाधव

भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी असलेले कुलभूषण जाधव हे महाराष्ट्रातील सांगलीचे आहेत. 49 वर्षीय जाधव सध्या पाकिस्तानमधील तुरुंगात आहेत. पाकिस्तानने केलेल्या दाव्यानुसार हेरगिरी आणि दहशतवादी कृत्य केल्याप्रकरणी जाधव यांना बलूचिस्तानमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा दिली. जाधव यांना अटक करण्यात आल्याची माहिती भारताला 25 मार्च 2016 रोजी देण्यात आली होती.

कसे पोहोचले पाकिस्तानात

जाधव यांच्या अटकेसंदर्भात पाकिस्तानने पहिल्यापासून दावा केला आहे की, जाधव हे भारताचे गुप्तहेर असून त्यांनी बलूचिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया केल्या आहेत. पाकिस्तानचा हा दावा भारताने फेटाळला आहे. जाधव हे भारतीय असून ते निवृत्त नौदल अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर व्यवसायाच्या निमित्ताने ते इराणला गेले होते. इराणमध्ये पाकिस्तानच्या गुप्तहेर अधिकाऱ्यांनी त्यांचे अपहरण केले आणि त्यांच्यावर खोटा खटला दाखल केला. या प्रकरणी जाधव यांची कोणतीही बाजून ऐकून न घेता पाकच्या लष्करी न्यायालयाने त्यांच्यावर हेरगिरी आणि दहशतवादाचा ठपका ठेवला आणि नंतर एप्रिल 2017मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली.

भारताने केला विरोध

पाकिस्तानने दबाव टाकून जाधव यांच्याकडून गुन्हा कबूल केल्याचा भारताने आरोप केला आहे. 2017मध्येच भारताने ICJमध्ये याचिका दाखल केली होती. कोर्टात पाकिस्तानने जाधव याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप भारताने खोडून काढले होते. इतक नव्हे तर भारताने पाकिस्तानकडून एकही ठोस पुरावा दिला नसल्याचे सिद्ध केले होते. जाधव यांना अटक झाल्यानंतर त्यांना काऊंसलर अॅक्सेस दिला नसल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात सांगितले होते. भारताने ICJकडे जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याची आणि त्यांची सुटका करण्याची मागणी केली आहे. ICJमध्ये भारताकडून जाधव यांची बाजू प्रसिद्ध वकील हरीष साळवे मांडत आहेत. पाकिस्तानने ICJसमोर भारताची जाधव यांना काऊंसलर अॅक्सेस देण्याची मागणी फेटाळली होती.

ICJचे म्हणणे काय

ICJमध्ये सुरु असलेल्या या सुनावणी दरम्यान 18 मे 2017 रोजी 10 जणांच्या खंडपीठाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली होती. या प्रकरणी अखेरची सुनावणी 19 फेब्रुवारी 2019 रोजी झाली होती. तेव्हा 17 जुलै 2019पर्यंत या सुनावणीला स्थगिती दिली होती.

असा आहे घटनाक्रम

25 मार्च 2016 : कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली.

10 एप्रिल 2017 : पाकिस्तान लष्कराच्या कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली.

8 मे 2017 : भारताने याबद्दल आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली.

15 मे 2017 : या खटल्याची सुनावणी झाली.

18 मई 2017: आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.

25 डिसेंबर 2017: कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने त्यांची भेट घेतली.

28 डिसेंबर 2017: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या भेटीबदद्ल संसदेत माहिती दिली.

VIDEO: 15 दिवसांत शेतकऱ्यांची पिक विमा द्या, नाहीतर...उद्धव ठाकरेंचा इशारा

First published: July 17, 2019, 2:11 PM IST

ताज्या बातम्या