भारतीय निवडणुकीतले हे आहेत काही विशेष आणि ऐतिहासिक प्रसंग

भारतीय निवडणुकीतले हे आहेत काही विशेष आणि ऐतिहासिक प्रसंग

आत्तापर्यंत आपल्यापर्यंत न पोहोचलेली निवडणूक आणि मतदानासंदर्भातली काही रंजन तथ्यं...

  • Share this:

मुंबई, 13 मे : सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा शेवटचा टप्पा आता राहिला आहे.  या निवडणुका 19 मे 2019 पर्यंत सुरू राहतील. आत्तापर्यंत आपण अपडेटससाठी प्रत्येक न्यूज चॅनल बघितलं असले तरी तिथे आपल्यापर्यंत न पोहोचलेली निवडणूक आणि मतदानासंदर्भातली काही रंजन तथ्यं इथे देत आहोत.

या वर्षी सुमारे 90 कोटी पात्र मतदारांसह, मतदारांही संख्या 2014 निवडणुकांनंतर 8.43 कोटी, इतकी‌ वाढली आहे. संपूर्ण युरोप आणि ब्राझीलमधली मिळून इतकी लोकसंख्या आहे.

एकूण मतदारांपैकी 1.66% टक्के किंवा 1.5 कोटी मतदार 18- 19 वयोगटातील आहेत आणि ते ह्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करतील आणि असे पात्र युवा एका सशक्त मतदार शक्तीचा भाग बनतील.

प्रत्येक मत मोजले जाते! या विधानाची सत्यता ह्यातून कळते की, निवडणूक आयोगाने सुमारे 10 लाख पोलिंग स्टेशन्स स्थापन केले आहेत व त्यांची संख्या 2014 च्या तुलनेत 10 टक्क्यांहून जास्त आहे. ही पहिलीच वेळ आहे की, एक हिंदू संन्यासी असलेल्या मतदारासाठी पश्चिम गुजरातमध्ये पहिल्यांदाच गीर वनात एक पोलिंग स्टेशन स्थापन केले जाणार आहे. पोलिंग पार्टी 39 किलोमीटर डोंगरावर चालून सोकेला तयांग ह्या अरुणाचल प्रदेशात राहणाऱ्या एकट्या मतदाराच्या मतदानासाठी गेली! ही खरी लोकशाहीची व्यवस्था आहे!

स्वातंत्र्य आणि लोकशाहीची लढाई दीर्घ काळाची आणि कठीण होती, पण मतदान आधी इतके अॅक्सेसिबल कधी नव्हते. निवडणूक स्लीपच्या ऐवजी ह्या वर्षी ही प्रक्रिया आधीपेक्षाही खूप सोपी आहे. आपल्याला आपले पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा आपला पासपोर्ट अशा कोणत्याही ओळखपत्रासाठीच्या 12 वैध कागदपत्रांपैकी एक सोबत ठेवून आपलं मत द्यावं लागलं.

आपल्याला माहिती आहे का की जगातील सर्वांत उंच पोलिंग स्टेशन भारतात आहे? हिमाचल प्रदेशातील 15,256 फूट उंचीवरचे ताशिगांग हे बौद्ध- बहुसंख्या असलेल्या लाहौल- स्पिती प्रदेशात हे पोलिंग स्टेशन आहे.

भारत पुढे जात आहे आणि एका ऐतिहासिक घटनेमध्ये पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांमध्ये महिला मतदारांची टक्केवारी पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. आधीच्या निवडणुकांमध्ये पुरुष मतदारांची टक्केवारी महिला मतदारांच्या टक्केवारीहून 20% जास्त असायची व त्या तुलनेत हा मोठा बदल आहे.

2014 च्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच व्होटर- व्हेरिफाईड पेपर ऑडीट ट्रेल्स (VVPATs)चा वापर आठ मतदारसंघांमध्ये करण्यात आला. पहिल्यांदाच ह्या वर्षी VVPATs चा वापर देशातील सर्व मतदारसंघांमध्ये करण्यात आला आहे आणि आपल्याला त्रुटी रहित आणि योग्य निवडणुका होतील, ह्याची खात्री घेण्यामध्ये ही बाब अतिशय महत्त्वाची ठरेल. VVPAT द्वारे मतदार त्यांनी केलेले मतदान त्यांच्या निवडीनुसार केले गेले आहे, हे पडताळून बघू शकतात. जेव्हा मत दिले जाते, तेव्हा दिलेल्या मताचा अनुक्रमांक आणि तपशीलांसह VVPAT प्रिंटरमध्ये एक स्लिप छापली जाते. मतदाराला ती सात सेकंदांसाठी बघता येते व त्यानंतर ती एका सोबत जोडलेल्या सीलबंद बॉक्समध्ये पडते.

भारत गेल्या 69 वर्षांपासून लोकशाही प्रजासत्ताक आहे आणि ह्याचे जीवंत साक्षीदार असलेले राम प्रसाद शर्मा हे सर्वांत वृद्ध मतदारांपैकी एक आहेत. 107 व्या वर्षाच्या शर्मा ह्यांनीउत्तर प्रदेशच्या सेमारांग गावामधून मतदान केले आहे. 1951- 52 मधील लोकसभा निवडणुकांपासून त्यांनी मतदान केले आहे आणि आजही ते सरकारच्या कार्याबद्दल स्वत:ला अपडेट ठेवतात. निवडणुकीच्या वेळेस ते त्यांचा मुलगा, कुटुंबीय व शेजा-यांना जाऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देतात.

39 दिवस आणि 7 टप्प्यांमध्ये होत असलेली 2019 ची निवडणूक ही भारताच्या इतिहासात चाललेली सर्वांत जास्त अवधीची निवडणूक आहे. 2014 निवडणुकासुद्धा 36 दिवसांमध्ये पूर्ण झाल्या होत्या.

इतिहासात पहिल्यांदाच, गुन्हेगारी खटले असलेल्या उमेदवारांना वृत्तपत्रे व टिव्ही चॅनल्सद्वारे त्यांची आकडेवारी सार्वजनिक करणे बंधनकारक केले गेले. ह्या प्रक्रियेमुळे मतदान प्रक्रिया आधीपेक्षाही जास्त पारदर्शक बनवणे हे उद्दिष्ट ठेवले गेले आहे.

मेच्या शेवटी अंतिम मतदान होत असताना ह्या लोकसभा निवडणुकांमध्ये जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचे भवितव्य निश्चित होणार आहे. तयार होऊन मतदान करण्याची वेळ आलेली आहे, ती चुकवू नका!

बटन दबाओ देश बनाओ हा नेटवर्क 18 चा उपक्रम आहे व तो आरपी- संजीव गोयंका ग्रूपद्वारे प्रस्तुत आहे व त्यामध्ये चालू लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक भारतीयाला मतदान करण्याचा आग्रह केला जात आहे. हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावरील संभाषण फॉलो करा- #ButtonDabaoDeshBanao.

 

First published: May 13, 2019, 2:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading