मराठी बातम्या /बातम्या /देश /

'यास' चक्रीवादळामुळं ओडिशात मुसळधार पावसाला सुरुवात; पुढील 2 दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे

'यास' चक्रीवादळामुळं ओडिशात मुसळधार पावसाला सुरुवात; पुढील 2 दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे

Yaas Cyclone: बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्याचं आज पहाटे यास चक्रीवादळात (Yaas Cyclone) रुपांतर झालं आहे. हे वादळ ताशी 4 किलोमीटरच्या गतीनं ओडिशाच्या किनारपट्टीकडे वाटचाल करत आहे.

    मुंबई, 24 मे: बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं आज पहाटे यास चक्रीवादळात (Yaas Cyclone) रुपांतर झालं आहे. हे वादळ ताशी 4 किलोमीटरच्या गतीनं ओडिशाच्या किनारपट्टीकडे वाटचाल करत आहे. सध्या हे वादळ ओडिशातील पारदीप (Paradip) बंदरापासून 520 किमी अंतरावर आहे. तर पश्चिम बंगालमधील दिघा बंदरापासून हे वादळ 610 किलोमीटर अंतरावर आहे. हे वादळ आता वेगानं ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीकडे मार्गक्रमण करत आहे. यास चक्रीवादळ हे तौत्के चक्रीवादळाच्या तुलनेत अधिक घातक आहे. या वादळाची स्वतः भोवती फिरण्याची गती सध्या ताशी 70 ते 80 किलोमीटर एवढी आहे. आज दिवसभरात ही गती ताशी 110 ते 120  किलोमीटरपर्यंत वाढू शकते, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यास चक्रीवादळामुळे सध्या ओडिशातील किनारपट्टीच्या बहुतांशी भागात सुसाट वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. ओडिशातील चंद्रभागा आणि कोणार्क याठिकाणी पावसाची स्थिती आणखीच भयंकर बनत चालली आहे. त्यामुळे किनारपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 26 तारखेच्या पहाटेपर्यंत 'यास' चक्रीवादळ उत्तर ओडीशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला तडाखा देणार आहे. त्यावेळी या वाऱ्याची गती 160 किलोमीटर पर्यंत वाढलेली असेल असा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवस महाराष्ट्राला हवामान खात्याचा इशारा मागील तीन दिवसांपूर्वी अंदमान निकोबार परिसरात मान्सूननं आगमान केलं आहे. पुढील आठवड्यात कोकणातही मान्सूनचं आगमन होणार आहे. असं असलं तरी, पुढील दोन दिवस महाराष्ट्रासाठी पावसाचे असणार आहेत. आज आणि उद्या पुण्यासह, नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cyclone, Weather forecast

    पुढील बातम्या