• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • गुप्तचर यंत्रणेकडून भारताला अलर्ट जारी, दहशतवादी संघटना हल्ला करण्याची शक्यता

गुप्तचर यंत्रणेकडून भारताला अलर्ट जारी, दहशतवादी संघटना हल्ला करण्याची शक्यता

भारतावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी म्हटलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 02 सप्टेंबर: गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence Agencies) भारताला (India) अलर्ट जारी केला आहे. भारतावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी म्हटलं आहे. गुप्तचर संस्थेनं जारी केलेल्या अलर्टनुसार, IS KP या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षित दहशतवादी (Terrorist Attack) भारतावर हल्ला करण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवादी संघटनेच्या उच्च कमांडनं भारतात उपस्थित असलेल्या त्याच्या स्लीपर सेलशी संपर्क साधला आहे. भारतात उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांना IED बनवण्यासाठी आणि लहान शस्त्रे खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं असल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणेनं दिली आहे. त्याचदरम्यान गुप्तचर अहवालांनुसार, IS च्या ठिकाणांमध्ये उजव्या विचारांचे नेते, धार्मिक स्थळे, पाश्चात्य देश आणि गर्दीची ठिकाणे यांचा समावेश आहे. तसंच ते परदेशी लोकांना लक्ष्य करू शकतात. गिलानींना श्रद्धांजली वाहताना इम्रान खान यांचं वादग्रस्त ट्विट, ओकली गरळ दहशतवादी संघटनांना बळ मिळेल दुसरीकडे, अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर तेथे दहशतवाद वाढण्याचा धोका वाढला आहे. म्हणूनच अफगाणिस्तानमध्ये एका सरकारची नितांत आवश्यकता आहे. असं मानलं जातं की, तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानं जगभरात अशांतता निर्माण होऊ शकते. अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा करणाऱ्या तालिबानचे पाकिस्तानशी चांगले संबंध आहेत. यामुळे असा अंदाज बांधला जात आहे की, आता जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांना मजबूती मिळेल. प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश निर्णय सोनिया गांधी यांच्या दरबारी भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी कारवाया वाढू शकतात असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणं आहे. दहशतवाद थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: