RSSचे नेते दहशतवाद्यांच्या 'हिट लिस्ट'वर, महाराष्ट्रात होऊ शकतो नवा VBIED हल्ला

RSSचे नेते दहशतवाद्यांच्या 'हिट लिस्ट'वर, महाराष्ट्रात होऊ शकतो नवा VBIED हल्ला

या आधीही नागपूरातलं संघाचं मुख्यालय हे अतिरेक्यांच्या टार्गेटवर होतं. त्यामुळं तिथली सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती.

  • Share this:

नवी दिल्ली 10 फेब्रुवारी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते जागतिक दहशतवाद्यांच्या 'हिट लिस्ट'वर असल्याची धक्कादायक माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलीय. या माहितीमुळे खळबळ उडाली असून संघाच्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येत आहे. IB या गुप्तचर संस्थेला याबाबत काही माहिती मिळाली असून त्याचं विश्लेषण करण्याचं काम सुरु असल्याची माहितीही दिली जातेय. अत्याधुनिक स्फोटकांच्या साह्याने हा हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

IED किंवा VBIEDs ( Vehicle-Borne Improvised Explosive Device) अशा अत्याधुनिक तंत्राचा वापर करत हा हल्ला होऊ शकतो. महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्ये हा हल्ला होऊ शकतो अशी माहितीही गुप्तचर सूत्रांनी दिलीय. महाराष्ट्रात नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे ज्येष्ठ नेते तिथं वास्तव्याला असतात. त्यामुळे या माहितीने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढवली आहे.

नोकरीत आरक्षण आणि प्रमोशन, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर लोकसभेत गदारोळ

या आधीही नागपूरातलं संघाचं मुख्यालय हे अतिरेक्यांच्या टार्गेटवर होतं. त्यामुळं तिथली सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत सर्व संबंधित राज्य सरकारांना पत्र पाठवलं असून सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले आहेत.

बंगळुरुमध्ये CAAच्या समर्थनासाठी निघालेल्या मोर्चात सहभागी झालेल्या संघाच्या नेत्याची हत्या करण्याचा कट उघडकीस आला होता. या प्रकरणी सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.

First published: February 10, 2020, 5:00 PM IST
Tags: RSS

ताज्या बातम्या