'मृत व्यक्ती'ने ऑनलाइन काढला 50 लाखांचा विमा, पुन्हा एक महिन्याने झाला मृत्यू

'मृत व्यक्ती'ने ऑनलाइन काढला 50 लाखांचा विमा, पुन्हा एक महिन्याने झाला मृत्यू

मृत्यूनंतर 9 दिवसांनी पॉलिसी काढली आणि त्यानंतर महिन्याभराने विम्याची रक्कम मिळावी यासाठी पत्नीने दावा केला. विशेष म्हणजे कंपनीच्या कर्मचाऱ्याने संबंधित व्यक्तिची वैद्यकीय तपासणीही करून घेतली होती.

  • Share this:

अलीगढ, 11 ऑक्टोबर : अनेकजण भविष्याची तरतूद म्हणून विमा पॉलिसी काढून ठेवतात. मृत्यूपूर्वी विमा पॉलिसी काढल्याचं अनेकदा ऐकलं असेल पण आता उत्तर प्रदेशात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका मृत व्यक्तिनं पॉलिसी बाजारवरून ऑनलाइन विमा काढला. त्यानंतर एक महिन्याचा हप्ताही जमा केला. त्यानंतर तो पुन्हा मरण पावला. मल्टिनॅशन विमा कंपनीने जेव्हा या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा ही फसवणूक असल्याचं समोर आलं आणि कंपनीसह पोलिस अधिकारीही हैराण झाले.

पॉलिसी बाजार डॉट कॉमवरून 8 मार्च 2018 साली अलिगढमध्ये राहणाऱ्या उपेंद्र नावाच्या व्यक्तीनं 50 लाख रुपयांचा विमा काढला होता. त्यासाठी उपेंद्रने ऑनलाइन 1 हजार 583 रुपये जमा केले होते. प्रीमियम म्हणून प्रत्येक आठवड्याला 531 रुपयांचा हप्ता भरण्याचे ठरले होते. त्यानंतर कंपनीने एक कर्मचारी पाठवून उपेंद्रची वैद्यकीय तपासणीही केली. सर्व सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर 12 मार्च 2018 ला कंपनीने उपेंद्रच्या नावाने पॉलिसीही दिली.

कंपनीने विमा पॉलिसी दिल्यानंतर उपेंद्रच्या पत्नीने 28 मे 2018 ला कंपनीकडे विम्याची रक्कम मिळण्यासाठी दावा केला. पत्नीने सांगितलं की, 15 एप्रिलला तिच्या पतिचा कुत्रा चावल्यानं मृत्यू झाला. याचा पुरावा म्हणून एका नर्सिंग होमने दिलेला मृत्यूचा दाखलाही सादर केला होता. 50 लाखांची पॉलिसी घेतल्यानंतर महिन्याभरात उपेंद्रचा मृत्यू झाल्यानंतर विमा कंपनीला संशय आला. त्यांनी याप्रकणाची चौकशी सुरू केली.

उपेंद्रच्या मृत्यूची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. पॉलिसी घेण्याच्या 9 दिवस आधीच म्हणजे 27 फेब्रुवारी 2018 ला त्याचा मृत्यू झाला होता. घरावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याची माहिती कंपनीला गावातील आशा वर्करच्या रजिस्टरमधून मिळाली. त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्रही देण्यात आलं होतं. मात्र, आरोपींनी ते रद्द केलं होतं. या प्रकरणी पोलिस चौकशी करत आहेत. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस तपास सुरू आहे.

VIDEO : भरधाव टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 02:57 PM IST

ताज्या बातम्या