चेन्नई, 23 मार्च : अनेकदा आपल्याला वाटतं, की आपलीच परिस्थिती अतिशय वाईट आहे. मात्र आसपास पाहिल्यास इतर अनेकजण आपल्याहून वाईट परिस्थितीत जगत असल्याचं दिसतं. इतकंच नाही अनेकजण त्या परिस्थितीवर मात करत उत्तुंग यशही मिळवतात. (Inspiring Story of Chennai Young Man)
आपल्या वाटचालीतून आणि संकटातही हिम्मत न सोडण्यातून इतरांनाही प्रेरणा देतात. असंच एक उदाहरण आहे एका तरुणाचं. हा तरुण चेन्नईमध्ये राहतो. याचं नाव आहे मणिकंदन. (Manikandan Police Officer Success Story)
मणिकंदन लहानपणीच अनाथ झाला होता. त्याचे वडील तो केवळ दुसऱ्या इयत्तेत असताना वारले. घरची परिस्थिती वाईट होती. आईनं काळजावर दगड ठेवत त्याला अनाथालयात पाठवलं. इथून त्याला शाळेत पाठवलं गेलं. त्याची आई त्याला भेटायला येत असे. (Struggle of Orphan Manikandan)
आईनंही केली आत्महत्या
मणिकंदन सातव्या इयत्तेत होता तेव्हा त्याची आई त्याला भेटायला आली होती. तेव्हा तो शाळेत गेलेला होता. मणिकंदनला भेटायला त्याची आई त्याच्या शाळेत गेली. तिथून आल्यावर आईनं परत अनाथालयात जात तिथल्या मुलांचे कपडे धुवून दिले. जेवणही बनवलं. त्यानंतर त्या घरी गेल्या. मग केवळ ही बातमी आली, की मणिकंदनच्या आईनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. (Chennai Manikandan struggle and Success story)
हेही वाचा लग्नासाठी दारोदार भटकत होता अडीच फूट उंचीचा अझिम; अखेर नवरी मिळाली नवऱ्याला!
मणिकंदनवर बालपणीपासूनच दुःखाचा डोंगर कोसळला. त्याला लहानपणीपासूनच पोलीस अधिकारी बनायचं होतं. अनाथालयाचे केअरटेकर परिभास्कर यांनी त्याच्यासाठी डॉक्टर शोधला. त्या डॉक्टरनं मणिकंदनच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च उचलायची तयारी दाखवली. मग मणिकंदननं खूप मन लावून अभ्यास केला.
उच्चशिक्षण घेतलं
मणिकंदननं अतिशय गुणवत्ता दाखवत उच्चशिक्षण घेतलं. त्यानंतर क्रिमिनॉलॉजी विषयात पुढचं शिक्षण घेत तो पारंगत झाला. 2007 मध्ये त्यानं सशस्त्र रिझर्व पोलीस दलात नोकरीचा अर्ज केला. निवड झालेल्या 13 हजार उमेदवारांमध्ये मणिकंदनचा क्रमांक होता 423 वा. सध्या तो अम्बत्तूर औद्योगिक क्षेत्राच्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे.
हेही वाचा बारा वर्षांनंतर हत्तीला दिसले आपला जीव वाचवणारे डॉक्टर, दिली अनोखी सलामी
मणिकंदन म्हणतो, 'मी अनेक लहान मुलांना बालपणातच वाया जाताना पाहिलं आहे. मी माझं अनाथालय आणि परिभास्कर या दोन्हींचा खूप आभारी आहे. त्यांच्यामुळंच आज मी इथं आहे.
मणिकंदनसारख्या लोकांच्या आयुष्यातून हे शिकायला मिळतं, की कधीच कशाला दोष न देत बसता आपल्या क्षमतांचा अधिकाधिक उपयोग केला पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.