मराठी बातम्या /बातम्या /देश /कोरोनानं कर्त्या पुरुषांना गिळलं, आता घरच्या सुनांनी खांद्यावर पेललं जबाबदारीचं शिवधनुष्य

कोरोनानं कर्त्या पुरुषांना गिळलं, आता घरच्या सुनांनी खांद्यावर पेललं जबाबदारीचं शिवधनुष्य

अनेकदा प्रतिकुल परिस्थितीतच महिला अधिक खंबीर होतात. इथेही तेच घडलं.

अनेकदा प्रतिकुल परिस्थितीतच महिला अधिक खंबीर होतात. इथेही तेच घडलं.

अनेकदा प्रतिकुल परिस्थितीतच महिला अधिक खंबीर होतात. इथेही तेच घडलं.

राजकोट, 20 मार्च : गुजरात इथल्या राजकोटच्या पानसुरिया कुटुंबातील दोन महिलांचा जीवनसंघर्ष आज अनेकांसाठी प्रेरणा बनला आहे. एरवी एकदम सामान्य आयुष्य जगणाऱ्या कुटुंबाबाबत असं नेमकं घडलं तरी काय? (inspiring story)

हे कुटुंब तब्बल 11 सदस्यांचं एकत्र कुटुंब होतं. मात्र कोरोनानं मोठाच घाला घातला. कुटुंबप्रमुख सत्तरवर्षीय बाबुभाई, त्यांची पासष्टवर्षीय पत्नी मंजुलाबेन, एक्कावन्नवर्षीय राजेश आणि एक्केचाळीसवर्षीय केतनला मागच्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोना झाला. चौघांनाही कोरोनानं हिरावून नेलं. केवळ 22 दिवसात कुटुंबातील चार सदस्य गेले. (gujrat rajkot news)

कुटुंबातील पुरुषांचं छत्र हरवलं तसं आता कुटुंबातील महिला पुढे सरसावल्या. दोन सुनांनी घराची जबादारी उचलली आहे. कुटुंबातील ट्रान्सपोर्टचा बिझनेस आता बंद पडला. कमावणारं कुणीच उरलं नाही. याआधी चार सदस्यांच्या उपचारावर मोठीच रक्कम खर्च झाली. आता कसं जगायचं हा प्रश्न निर्माण झाल्यावर घरातील सुनांनी आयुष्यात पहिल्यांदा घराबाहेर पाऊल ठेवलं. (four earning men die in corona)

सपना आणि नयना या दोन सुना म्हणतात, 'जीवनातल्या संघर्षात थकल्यानंतर विश्रांती असू शकते, पण थांबणं आम्हाला मंजूर नाही. जगणं पुन्हा रूळावर आणण्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत.' आता आम्ही कुटुंबाची जबाबदारी मिळून सांभाळू. (daughter take responsibility of house as men die)

हेही वाचा महिलाही होऊ शकतात रेस्तराँच्या उत्तम शेफ; अनुकृती देशमुख बदलवतेय मानसिकता

अडतीसवर्षीय सपना म्हणाल्या, की कुटुंबातील सगळे ज्येष्ठ सोडून गेले तसं आता 15 वर्षानंतर नोकरीसाठी घराचा उंबरठा ओलांडण्याची वेळ आली. आवक सगळी बंद झाली आणि काहीच बचतही उरली नाही. मुलाचा पुढचा अभ्यास आणि त्याचं भविष्य यासाठी मी डेअरीमध्ये हिशेब पाहण्याची नोकरी धरली आहे. माझं शिक्षण आज कामाला आलं.' (family looses men in corona woman take the responsibility)

मोठी सून नयना घरातील पूर्ण काम सांभाळते. तिची दोन मुलं आहेत. मोठा लग्न झालेला आहे आणि लहान दिव्यांग आहे. रोज काम संपवून नयना घरी इमिटेशन ज्वेलरी बनवते. ती म्हणते, 'जे झालं ते विसरता येणार नाही. आता कुणाचा फोन आला अंतरी हृदय धडधडू लागतं. असं वाटतं, की हॉस्पिटलमधून तर फोन आला नसेल? कोरोनाकाळातील चार महिने आम्ही दिवसरात्र रडून काढले. सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आता तरीही आम्ही थांबू शकत नाही. आता कुटुंबातील मुलगा बनून आम्ही जबाबदारी निभावू. संघर्ष यशस्वी करण्यासाठी आम्ही पदर खोचले आहेत.'

हेही वाचा फाटक्या जीन्सविषयी बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांची पत्नी जिंकली होती सौंदर्यस्पर्धा

हॉस्पिटमधून दिला होता शेवटचा संदेश

सपनाबेन यांचा 12 वर्षांचा मुलगा मीत आईला रडताना पाहून म्हणतो, 'आई तू रडू नकोस. आपण पपा, आजी-आजोबांच्या आठवणीत जगू.' सपनाही त्याची पाठ थोपटते. मीतचे वडील केतनभाई यांनी सर्वात शेवटी हॉस्पिटलमधून मीतच्या वाढदिवशी फोन केला होता. ते त्याला म्हणाले होते, 'नेहमी गरिबांची मदत करत रहा.'

First published:
top videos

    Tags: Corona virus in india, Inspiring story