अवघ्या 17 व्या वर्षी झाला Acid Attack, मात्र खचली नाही; आता बॉयफ्रेंडसोबत बांधतेय लग्नगाठ

अवघ्या 17 व्या वर्षी झाला Acid Attack, मात्र खचली नाही; आता बॉयफ्रेंडसोबत बांधतेय लग्नगाठ

Acid Attack Survivor Marriage: अ‍ॅसिड अटॅक करणं ही एक भयानक विकृती आहे. या विकृतीला सामोरं जात आयुष्य नव्यानं जगणाऱ्या तरुणीची ही सशक्त गोष्ट.

  • Share this:

भुवनेश्वर, 3 मार्च : एकतर्फी प्रेम किंवा विविध कारणांनी अ‍ॅसिड अटॅकचा बळी होणाऱ्या तरुणी आणि महिला हे भारत देशातील नकोसं वास्तव आहे. अशाच एका तरुणीची ही कथा. मात्र या कथेनं आता जरासं सुखद वळण घेतलं आहे. (Acid Attack Marriage)

प्रमोदिनीला वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी अ‍ॅसिडअटॅकचा सामना करावा लागला. सोमवारी तिनं वयाच्या 29 व्या वर्षी आपल्या बॉयफ्रेंडसोबत विवाह (Acid Attack Survivor Marriage) केला. ही घटना भुवनेश्वरमध्ये घडली. (Pramodini Acid Attack Survivor)

ओरिसाच्या जगतसिंहपूर जिल्ह्यात राहणाऱ्या प्रमोदिनीनं सोमवारी आपले नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत बॉयफ्रेंड सरोज साहू याच्याशी विवाह केला. केवळ 17 वर्षांची असताना तिनं अ‍ॅसिड अटॅकचं (Acid Attack) वेदनादायी वास्तव सहन केलं. यात तिचं शरीर तब्बल 80 टक्के होरपळलं होतं. इतकंच नाही, तर यात प्रमोदिनीचे दोन डोळेही हिरावले गेले. (Navin Patnayak asks to reopen acid attack case)

स्वतःची काहीच चूक नसताना घडलेल्या या भयानक अपघातानंतरही प्रमोदिनी उर्फ राणीची हिम्मत ढासळली नाही. उलट सगळी ताकद तिनं स्वयंपूर्ण होण्याच्या प्रवासात लावली. जगतसिंहपूरच्या कनकपूर गावात विवाहबंधन बांधून घेतल्यावर प्रमोदिनी म्हणाली, की हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस आहे. मी माझं कुटुंब आणि प्रियकर अशा सगळ्यांच्या मर्जीनं लग्न करू इच्छित होते आणि तसंच झालं. माझ्या प्रिय व्यक्तीसोबत मी आयुष्य घालवणार आहे. (Odisha acid attack survivor gets married)

तीन बहिणींपैकी एक असलेली प्रमोदिनी 2009 मध्ये एका कॉलेजात बारावीला शिकत होती. संतोष वेदांत कुमार नावाच्या एका तरुणानं तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र प्रमोदिनीनं त्याला होकार दिला नाही. या रागातून त्यानं प्रमोदिनीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकलं. प्रमोदिनीच्या कॉलेजजवळ एक आर्मी कॅम्प सुरू होता. तेव्हा संतोषने प्रमोदिनीला पाहिलं होतं. प्रमोदिनीचं वय तेव्हा खूप कमी होतं आणि तिला शिकण्याचीही इच्छा होती म्हणून तिनं आणि तिच्या कुटुंबानंही हा प्रस्ताव नाकारला. (Pramodini acid attack survivor)

मात्र नंतरही संतोष सतत प्रमोदिनीचा पाठलाग करत राहिला. 4 मे 2009 रोजी त्यानं तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकलं. यात तिचं शरीर वाईट पद्धतीनं जळालं. सोबतच शरीराचा अर्धा भाग लकवाग्रस्तही झाला. याविरुद्ध प्रमोदिनीनं पोलिसात जात एफआयआरही केली होती. मात्र 2012 पर्यंत पोलिसांना काहीच धागेदोरे शोधता आले नाही. शेवटी पोलिसांनी या प्रकरणाची फाईल बंद केली. संतोष आणि त्याची पत्नी तेव्हा लहान मुलासह कुपवाडा इथं राहत होते.

हे प्रकरण नंतर एकदा पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झालं. तेव्हा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या तरुणीची भेट घेतली. प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास करण्याचे आदेश दिले. संतोषला 2017 मध्ये अटक झाली. आजवर तो गजांआड आहे.

हेही वाचा आपल्याच प्रेमात आकंठ बुडाली; बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करून स्वतःशीच केलं लग्न

2014 मध्ये भुवनेश्वरच्या बलकटी भागात प्रमोदिनी आणि सरोज साहू यांची पहिल्यांदा भेट झाली. ज्या हॉस्पिलमध्ये प्रमोदिनी उपचार घेत होती तिथली एक नर्स सरोजची मैत्रीण होती. तिनं सरोजला अ‍ॅसिड अटॅक पीडितांच्या वेदना पाहण्यास बोलावलं होतं.

हेही वाचा 'सुशांत गेला यात माझी काय चूक?', VIDEO तून अंकिताचं ट्रोलर्सना सणसणीत उत्तर

त्यावेळी सरोजनं प्रमोदिनिशी संवाद साधण्याचा अप्रयत्न केला. पण त्याला तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कारण ती झालेल्या अपघातामुळे अत्यंत घाबरलेली आणि उद्विग्न होती. ती कुणाशीच जास्त बोलत नसे.

मात्र हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढला. भेटी होत गेल्या. आधी मैत्री आणि मग प्रेम फुललं. दोघांचं कुटुंबही शेवटी या लग्नासाठी तयार झालं. आता प्रमोदिनी आणि सरोज एकमेकांचे आयुष्यभराचे साथीदार बनले आहेत.

Published by: News18 Desk
First published: March 3, 2021, 10:49 PM IST

ताज्या बातम्या