हत्तींचा खरा साथी! मुलाला एक पैसा न देता हत्तींच्या नावावर केली 5 कोटींची संपत्ती

हत्तींचा खरा साथी! मुलाला एक पैसा न देता हत्तींच्या नावावर केली 5 कोटींची संपत्ती

काही दिवसांपूर्वी केरळमध्ये (Keral) एका गरोदर हत्तीणीचा झालेल्या मृत्यूनं साऱ्या देशाला हादरलं. या प्रकारानंतर माणसावरचा विश्वास उडाला. मात्र माणुसकी काहीशी जिवंत असल्याचा प्रत्यय पटनातील दानापूरच्या जानीपुरातून समोर आली आहे.

  • Share this:

पटना, 09 जून : काही दिवसांपूर्वी केरळमध्ये (Keral) एका गरोदर हत्तीणीचा झालेल्या मृत्यूनं साऱ्या देशाला हादरलं. या हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं नारळ दिल्याचा बोललं जात आहे. या प्रकारानंतर माणसावरचा विश्वास उडाला. मात्र माणुसकी काहीशी जिवंत असल्याचा प्रत्यय पटनातील दानापूरच्या जानीपुरातून समोर आली आहे. एकीकडे बरेच लोक हत्तींना ठार मारुन त्यांची त्वचा आणि दाताची तस्करी करत असताना, पटनाच्या जानीपूर येथील अख्तर इमामनं दोन हत्तींच्या नावावर 5 कोटीं संपत्ती केली.

मुख्य म्हणजे इमामच्या म्हणण्यानुसार त्यांचा मुलगा वाईट मार्गानं गेला होता, म्हणून त्याला संपत्तीचा हिस्सा न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं इमाम यांनी आपली अर्धी संपत्ती पत्नी आणि हत्तींच्या नावावर केली. इमाम यांनी रजिस्ट्री कार्यालयात जाऊन दोन्ही हत्तींच्या नावावर तयार केलेली कागदपत्रेही मिळाली आहेत.

अख्तर इमाम यांनी सांगितले की, मला काही झाले तर सर्व मालमत्ता इरावत नावाच्या संस्थेच्या नावे होईल, जेणेकरुन या हत्तींचे रक्षण होईल आणि त्यांना तस्करांपासून वाचवता येईल. मुख्य म्हणजे इमाम यांचे दोन्ही हत्तींवर जीवापाड प्रेम आहे. अख्तर इमाम यांनी सांगितले की त्याने आपल्या दोन हत्तींची नावेही ठेवली आहेत. एकाचे नाव मोती तर दुसर्‍याचे नाव राणी. त्यांच्यासाठी हत्ती हेच कुटुंब किंवा समाज आहेत. अख्तर इमाम हेच इरावत हे संस्थेचे मुख्य व्यवस्थापक देखील आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य फक्त हत्तींसाठीच वाहिलेले आहे.

वाचा-आता हद्द झाली! हत्तीणीनंतर कुत्र्यावर पाशवी अत्याचार; औरंगाबादमधील भयंकर VIDEO

वाचा-धक्कादायक! केरळमध्ये याआधी झाला आहे हत्तीणीचा फटाक्यांमुळे क्रूर मृत्यू

हत्तींनी वाचवले होते प्राण

अख्तर इमाम म्हणतात की एकदा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच वेळी हत्तीने मला वाचवले. त्याने सांगितले की एकदा हातात पिस्तूल असलेला बदमाश आमच्या घरात घुसला, तेव्हा हत्ती त्यांच्यावर चालून गेला. आणि ते चोरटे पळून गेले.

हत्तीच्या नावांवर संपत्तीच्या विरोधात परिवार

अख्तर यांची गोष्ट थोडीशी वेगळी यासाठी आहे की, त्यांच्या मुलानं संपत्ती मिळवण्यासाठी वडिलांवर बलात्काराचे खोटे आरोप लगावले होते. तपासणी दरम्यान हे आरोप खोटे असल्याचे समोर आले. अख्तरचा आरोप आहे की माझा मुलगा मेराजनेही पशू तस्करांना हत्ती विकण्याचा प्रयत्न केला होता पण तो पकडला गेला. म्हणून त्यांनी सर्व संपत्ती हत्तींना देण्याचा निर्णय घेतला.

वाचा-मन हेलावून टाकणारं दृश्य, हत्तीणीच्या मृत्युमुळे पिल्लाला रडू कोसळलं

संकलन, संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 9, 2020, 2:46 PM IST
Tags: elephant

ताज्या बातम्या