मराठी बातम्या /बातम्या /देश /

संशयास्पद अवस्थेत आढळला इन्स्पेक्टरचा मृतदेह; दिल्ली दंगलीचा करीत होते तपास

संशयास्पद अवस्थेत आढळला इन्स्पेक्टरचा मृतदेह; दिल्ली दंगलीचा करीत होते तपास

इन्स्पेक्टर यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. मृतदेह पाहून नेमकी परिस्थिती कळत नसल्याने सांगितले जात आहे.

इन्स्पेक्टर यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. मृतदेह पाहून नेमकी परिस्थिती कळत नसल्याने सांगितले जात आहे.

इन्स्पेक्टर यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. मृतदेह पाहून नेमकी परिस्थिती कळत नसल्याने सांगितले जात आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 6 जून : दिल्ली पोलिसांच्या एका निरीक्षकाचा मृतदेह गाडीमध्ये संशयास्पद अवस्थेत सापडला. हा मृतदेह केशवपुरम पोलीस ठाण्याच्या रामपुरा भागात आढळल्याची माहिती समोर आली आहे. इन्स्पेक्टरच्या शरीरावर कोणत्याही खूणा नव्हत्या. इन्स्पेक्टर लोधी कॉलनी स्पेशल सेलमध्ये तैनात होते. दिल्ली दंगलीचा तपास करणार्‍या खास सेल टीमचे ते एक भाग होते. दिल्ली पोलिसांना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास याबाबत माहिती मिळाली. सकाळी 11 वाजल्यापासून एक कार रुमाल गल्लीत केशवपुरममध्ये उभी होती, ज्यामध्ये एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्या व्यक्तीला गाडीतून बाहेर काढले असता कारमधील व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजले. इन्स्पेक्टर विशाल असे मृताचे नाव असून ते सुमारे 47 वर्षांचे आहे. विशाल हे दिल्लीच्या शालीमार बाग भागात राहत होते. निरीक्षकाची पोस्टिंग सध्या स्पेशल सेल लोधी कॉलनीच्या कार्यालयात होती. विशाल हे विशेष कक्षाचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांचे एसओ म्हणून काम पाहत होते. दिल्ली दंगलीचा तपास करणाऱ्या टीमसह ते काम करीत होते. त्यांच्या शरीरावर कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीस उत्तर पूर्व दिल्लीत बर्‍याच ठिकाणी हिंसाचार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 78 आरोपपत्र दाखल केले आहेत. त्याच वेळी दोन्ही समुदायातील 164 आणि 142 लोकांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखेने दोन्ही समुदायातील 41 आणि 63 लोकांना अटक केली आहे आणि सर्वाविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एकंदरीत, आतापर्यंत दोन्ही समुदायातील 205-205 लोकांना अटक करण्यात आली आहे आणि सर्वांवर आरोपपत्र दाखल केले गेले आहे. हे वाचा -कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढला, मात्र चिंता कायम, वाचा सर्व अपडेट्स
First published:

पुढील बातम्या