मराठी बातम्या /बातम्या /देश /असंवेदनशीलता! प्रसव कळांनी विव्हळत होती गर्भवती; शेवटी रुग्णालयाजवळील पार्कातच दिला बाळाला जन्म

असंवेदनशीलता! प्रसव कळांनी विव्हळत होती गर्भवती; शेवटी रुग्णालयाजवळील पार्कातच दिला बाळाला जन्म

हा प्रकार समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला,

हा प्रकार समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला,

हा प्रकार समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला,

लुधियाना, 19 फेब्रुवारी :  देशात वारंवार रुग्णालयाकडून निष्काळजीपणाच्या घटना समोर येत असतात. अशातच गुरुवारी पंजाबमधील लुधिया स्थित सिव्हील रुग्णालयात धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. सिव्हील रुग्णालयातील मदर अँण्ड चाइल्ड विभागातील लेबर रुममधील स्टाफने असंवेदनशीलतेच्या सर्व सीमा पार केल्या. गुरुवारी प्रसव वेदनांनी कळवळणारी एक महिला रुग्णालयात पोहोचली. मात्र त्या स्टाफला तिची वेदना कळलीच नाही. आणि अशातच महिलेने बगिच्यातच बाळाला जन्म दिला.

या पीडित महिलेने सांगितलं की, ती नियमित तपासणी करण्यासाठी रुग्णालयात आली होती. तपासानंतर रुग्णालयाने रुग्णवाहिका मागवली. मी पतीची प्रतीक्षा करीत पार्कात बसायला म्हणून गेले. येथेच महिलेला प्रसव कळा सुरू झाल्या आणि महिलेने पार्कमध्येच बाळाला जन्म दिला. महिलेचं म्हणणं आहे की, तिला रुग्णालयाकडून औषध तर दिलं गेलं, मात्र अशा कठीण प्रसंगी रुग्णालयातील कोणीच तिच्या मदतीसाठी आलं नाही.

त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कामवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रुग्णालयाचे एसएमओ डॉ. अमरजीत कौर यांचं म्हणणं आहे की, ही घटना त्यांच्या निदर्शनात आणण्यात आली आहे. त्यांनी सांगितलं की, 26 आठवड्यांची गर्भवती महिलेला वेळे पूर्वीच प्रसव कळांबरोबरच एनीमिया आणि काविळीवरील उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

हे ही वाचा-नागपुरात कडक निर्बंध; अंत्यविधीला फक्त 20 जण; हॉटेल्सही 50 टक्के क्षमतेने

" isDesktop="true" id="523675" >

कौर हिचं म्हणणं आहे की, जेव्हा रुग्णालयाने ईसीजीसाठी रुग्णवाहिकेची सोय केली, तेव्हा ती पार्कात जाऊन बसली. जेथे तिला प्रसव कळा सुरू झाल्या व तिने बाळाला जन्म दिला.

First published:
top videos

    Tags: Pregnant woman