'खुनी मुलाला भेटून कसं वाटतंय?' पाकिस्तानी मीडियाकडून कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला असंवेदनशील प्रश्न

'खुनी मुलाला भेटून कसं वाटतंय?' पाकिस्तानी मीडियाकडून कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला असंवेदनशील प्रश्न

पाकचा हा नीचपणा इथेच थांबला नाहीये. कुलभूषण जाधवच्या आई आणि पत्नीचा अपमान पाकिस्तानी मीडियानं केल्याचा धक्कादायक व्हिडिओच समोर आलाय.

  • Share this:

27 डिसेंबर : कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी इस्लामाबादमध्ये गेलेल्या त्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तानने जी वागणूक दिली त्यावर भारतानं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. पण पाकचा हा नीचपणा इथेच थांबला नाहीये. कुलभूषण जाधवच्या आई आणि पत्नीचा अपमान पाकिस्तानी मीडियानं केल्याचा धक्कादायक व्हिडिओच समोर आलाय.

इस्लामाबादमध्ये कुलभूषणला भेटल्यावर त्याची आई आणि पत्नी जेव्हा बाहेर आल्या, तेव्हा त्यांना अतिशय संतापजनक आणि अपमानास्पद प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींकडून विचारण्यात आले. 'आपल्या खुनी मुलाला भेटून कसं वाटतंय? तुमच्या पतीदेवांनी हजारो निष्पाप पाकिस्तान्यांचा जीव घेतलाय. रक्ताची होळी खेळलेत तुमचे पतीदेव. कसं वाटतंय तुम्हाला ?' असे अतिशय असंवेदनशील प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्यामुळे पाकचा नापाक चेहरा समोर आला आहे.

कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीने 25 डिसेंबरला त्यांची पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात भेट घेतली होती. भेटीच्या वेळी कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला मंगळसुत्र, बांगड्या काढण्यासही सांगण्यात आलं होतं. त्याचबरोबर कुंकू लावण्याची परवानगीही देण्यात आली नाही. कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला त्यांची मातृभाषा मराठीत बोलण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. या दोघींनाही बोलण्यास माध्यमांना परवानगी देण्यात येऊ नये अशी अट भारतानं घातली होती मात्र पाक माध्यमांनी या दोघींचाही विविध प्रश्न विचारून छळ केल्याचंही रवीश कुमार यांनी सांगितलं.

आणि आता या सगळ्याचा व्हिडिओच व्हायरल झाला आहे.

First published: December 27, 2017, 8:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading