मेट्रोही महिलांसाठी असुरक्षित, तरुणाने भर मेट्रोत काढली पॅन्ट आणि...

मेट्रोही महिलांसाठी असुरक्षित, तरुणाने भर मेट्रोत काढली पॅन्ट आणि...

त्याने केलेल्या अश्लिल कृत्यामुळे ती बराच वेळ काही सांगू शकत नाही

  • Share this:

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : दिल्ली मेट्रोत एका तरुणाने अश्लिल प्रकार केला आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी सायंकाळी सहा वाजता यलो लाइन मेट्रोमध्ये घडली. या मेट्रोमधील एक तरुणी दिल्लीहून गुडगावकडे जात होती. तिच्यासमोर उभ्या असलेल्या एका तरूणाने त्याच्या पॅन्टची झिप उघडली आणि अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. यामुळे ती तरुणी घाबरुन गेली. त्यावेळी काय झालं ते ती कोणालाही सांगू शकली नाही. मात्र तिने मुलाचे छायाचित्र काढले व नंतर पोलिसांत तक्रार दाखल केली.

तरुणीने आरोप केला आहे की पोलीस पहिल्यांदा तक्रार दाखल करुन घेण्यास दिरंगाई करीत होती. मात्र महिलेने हेल्पलाईन क्रमांकावर कॉल केल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली.  लैंगिक छळअंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे. फोटोच्या मदतीने पोलीस आरोपीचा तपास करीत आहे.

मेट्रोत उघडली पॅन्टची जिप

तरुणीने सांगितल्यानुसार, सायंकाळी ती नोकरीवरुन घरी जात होती आणि मेट्रोच्या सातव्या कोचमधील शेवटच्या टू सीटर असलेल्या जागेवर बसली होती. मेट्रोच्या गेटसमोर एक तरुण उभा होता. जो टक लावून तिच्याकडे बघत होता. काही वेळाने त्याने तरुणीसमोर आपल्या पॅन्टीची चैन उघडली. आणि तिला Sexually harass करू लागला. आरोपीने समोरच्या बाजूला बॅग अडकवली होती. तरुणीने सांगितल्यानुसार, हा तरुण किमान 1 मिनिटं अश्लिल चाळे करीत होता. त्यानंतर मात्र तरुणी खाली बघू लागली.

पीडितेचे ट्विटवर हा घृणास्पद अनुभव शेयर केला होता. त्यावर डीएमआरसीने प्रतिक्रिया दिली आहे. यावर तरुणींनी तातडीने मेट्रो वा सीआयएसएफच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा जवळील मेट्रो स्टेशन कर्मचाऱ्यांशी संपर्क करू शकता. अशा प्रकरणात तातड़ीने कारवाई केली जाते, असे ते म्हणाले.

First published: February 14, 2020, 12:22 PM IST

ताज्या बातम्या