भारत-पाकमधील शांततेसाठी केलेल्या पुढाकाराचे ओमर अब्दुल्लांकडून स्वागत, म्हणाले...

भारत-पाकमधील शांततेसाठी केलेल्या पुढाकाराचे ओमर अब्दुल्लांकडून स्वागत, म्हणाले...

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतीसाठी घेतलेल्या पुढाकाराचं स्वागत केलं आहे.

  • Share this:

जम्मू-काश्मीर, 27 मार्च : नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतीसाठी घेतलेल्या पुढाकाराचं स्वागत केलं आहे. ते म्हणाले की, दोन्ही देशांना गुप्त वार्ताहून पुढे जाऊन काश्मीरसह सर्व मुद्द्यांवर उत्तर शोधण्यासाठी मोकळेपणाने संवाद साधायला हवा. काश्मीरच्या दक्षिणेकडील पुलवामा जिल्ह्यात पक्षाच्या एका कार्याक्रमात बातचीत करताना उमर म्हणाले की, त्यांच्या पक्षाने नेहमीच सांगितलं आहे की, केवळ जम्मू काश्मीरचं नाही तर संपूर्ण दक्षिण आशियाचं भलं दोन्ही देशांच्या मैत्रीत आहे.

उमर अब्दुल्ला पुढे म्हणाले की, हे चांगलं आहे की, दोन्ही देश एकमेकांना धमकी देण्याशिवाय मित्रत्वाबद्दल बोलत आहेत. मात्र अद्यापही बऱ्याच गोष्टी शिल्लक आहेत. भारत आणि पाकिस्तानदरम्यान गुप्त वार्ता संबंधी बातम्यांचा उल्लेख करीत नॅशनल काॅन्फरन्सचे उपाध्यक्षांनी सांगितलं की, दोन्ही देशांमध्ये सर्व मुद्द्यांवर उत्तर मिळविण्यासाठी मोकळेपणाने बातचीत करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा- VIDEO : तामिळनाडू निवडणूक प्रचारात 'गुजराती दांडिया'; स्मृती इराणींनी धरला ताल

ते म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये गुप्त वार्ता आयोजित केल्याची बाब ऐकण्यात आली होती, मात्र आमचा विश्वास आहे की, लवकरच दोन्ही देश एकत्र बसून संवाद साधतील. त्यांना जम्मू-काश्मीरसह अनेक मुद्द्यांवर संवाद साधता येईल. पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांच्याशी प्रवर्तन निदेशालयाकडून केल्या जाणाऱ्या चौकशीबद्दल उमर म्हणाले की, केंद्राच्या नीतींचा विरोध करण्यासाठी ही किंमत मोजावी लागत आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत मुफ्की या अशा पहिल्या नेत्या नाहीत आणि अंतिमही नाहीत. गेल्या काही वर्षात आमचा हा अनुभव राहिला आहे की, केंद्राच्या नीतींचा विरोध केल्याची किंमत अशा संस्थांच्या मार्फत चुकवावी लागत आहे. मात्र जेथेही ही कारवाई होईल, त्याचा मजबुतीने सामना केला जाईल.

 

Published by: Meenal Gangurde
First published: March 27, 2021, 10:06 PM IST

ताज्या बातम्या