भुवनेश्वर, 30 मार्च: एका गर्भवती महिलेने (Pregnant woman) हेल्मेट परिधान न केल्याने (Not wear helmet) एका महिला पोलिसाने अधिकाऱ्याने (Woman police officer) अमानुष वागणूक दिली आहे. एका छोट्याशा चुकीसाठी पावती फाडून सोडून देण्याऐवजी संबंधित महिला अधिकाऱ्याने दंडेलशाहीचा अवलंब केला. त्यामुळे संबंधित गर्भवती महिलेला भर उन्हात 3 किमी पायपीट (Pregnant walked 3 km) करावी लागली आहे. या प्रकरणाने पोलीस विभागात संताप्त व्यक्त केला असून संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. रीना बक्सल असं निलंबित केलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
संबंधित गर्भवती महिलेच्या पतीचं नाव विक्रम बिरूली असून तो ओडिशाच्या मयुरभंज जिल्ह्यातील मटकामी या गावातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवसी विक्रम आपल्या आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीला दुचाकीवरून उडाला याठिकाणी रुग्णालयात तपासणीसाठी घेवून जात होता. यावेळी वाटेत पोलिसांची चेकींग सुरू होती. दरम्यान रस्त्यावरील पोलिसांनी या दाम्पत्याला अडवलं. दुचाकीची सर्व कागदपत्रे होती, मात्र पाठीमागे बसलेल्या गर्भपती पत्नीने हेल्मेट परिधान केला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी दंड भरण्याचा आग्रह केला.
(हे वाचा-'आजोबांनी केलं होतं लैंगिक शोषण, बहिणीलाही सोडलं नाही,' अभिनेत्रीचा गौप्यस्फोट)
याप्रकरणी गर्भवती महिलेच्या पतिने पोलिसांना सांगितलं की, माझ्याकडे फारसे पैसे नाहीत. मी माझ्या पत्नीला रुग्णालयात घेऊन जात आहे. त्यामुळे तुम्ही पावती तयार करून द्या. मी आरटीओ ऑफिसमध्ये जावून हे चलन भरतो. पण पोलिसांनी त्याचं ऐकलं नाही. त्याला गाडीत बसवून पोलीस स्थानकात नेण्यात आलं. यावेळी गर्भवती पत्नी घटनास्थळीच उभी होती. काहीकाळ वाट पाहिल्यानंतर गर्भवती महिला भर उन्हात पोलीस स्थानकाच्या दिशेने 3 किमी चालत गेली.
(हे वाचा- अनैतिक संबंधातून गर्भवती महिलेचा बेदम मारहाणीत मृत्यू; लिव्ह इन पार्टनरला अटक)
गर्भवती महिलेचा पती विक्रमने केलेल्या दाव्यानुसार, त्याने आपल्या पत्नीला सोबत गाडीत घ्या असं सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी काहीही न ऐकता, त्याच्या पत्नीला रस्त्यावरच सोडून दिलं. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर मयुरभंज एसपी परमार समित पुरुषोत्तम दास यांनी ओआयसी रीना बक्सल यांना सोमवारी निलंबित केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Odisha