S M L

पत्नीने नपुंसक म्हटल्यामुळे नवऱ्याने दुसऱ्या तरुणीसोबत पॉर्न व्हिडिओ बनवून सासऱ्याला पाठवला

दोघांच्याही घरातल्यांनी लग्न मोडू नये याचा प्रयत्न केला होता

Updated On: Aug 10, 2018 10:18 PM IST

पत्नीने नपुंसक म्हटल्यामुळे नवऱ्याने दुसऱ्या तरुणीसोबत पॉर्न व्हिडिओ बनवून सासऱ्याला पाठवला

हैदराबाद, १ ऑगस्ट- हैदराबादमध्ये नपुंसकतेचा आरोप लावून घटस्फोट मागणाऱ्या पत्नीला पतीने अनोख्या पद्धतीने उत्तर दिले आहे. पतीने दुसऱ्या तरुणीसोबत पॉर्न व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ त्याने चक्क सासऱ्यांना पाठवला. पण त्याचा हा डाव उलटला आणि त्याला तुरूंगात जावे लागले. त्याचे झाले असे की, त्याच्या सासऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. सध्या तो तुरूंगात आहे. २०१६ मध्ये महेश आणि कनिका (दोघांचीही नावं बदलली आहेत) यांचे लग्न झाले होते. वेगळे होण्यापूर्वी दोघंही फक्त १५ दिवस एकत्र राहिले होते. दोघांच्याही घरातल्यांनी लग्न मोडू नये याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. घटस्फोटासाठी कनिकाने महेशवर नपुंसक असल्याचा आरोप केला होता.

महेशला त्याच्यावरील हे आरोप कळले तेव्हा तो रागाने लालबुंद झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशने कनिकाला चुकीचं सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या तरुणीसोबत पोर्न व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ सासऱ्याला पाठवला. तो व्हिडिओ पाहून कनिकाच्या वडिलांनी आणि काकूने चेन्नई येथे पोलिस तक्रार केली. पोलिसांनी चौकशी केली असता महेशने या सर्व जाणीवपूर्वक केल्या असल्याचा स्वीकार केला. पोलिसांना महेशवर अश्लील व्हिडिओ पाठवणं, उत्पीडन आणि लिंग टिप्पणी करण्याच्या आरोपावर अटक केली आहे.

हेही वाचा-

मुलींसमोर स्मार्ट दिसायचंय.. तर मग या गोष्टी कराच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2018 02:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close