Infosysला सर्वात मोठा झटका; काही मिनिटातच 45 हजार कोटी बुडाले!

Infosysला सर्वात मोठा झटका; काही मिनिटातच 45 हजार कोटी बुडाले!

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिस(Infosys)च्या व्यवस्थापनावर झालेल्या गंभीर आरोपाचे परिणाम मंगळवारी शेअर बाजारात दिसून आले.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिस(Infosys)च्या व्यवस्थापनावर झालेल्या गंभीर आरोपाचे परिणाम मंगळवारी शेअर बाजारात दिसून आले. मंगळवारी शेअर बाजारात सकाळी 11 वाजेपर्यंत इन्फोसिसचे शेअर (Infosys Stock Price) 15 टक्क्यांनी कोसळले आणि त्याचा परिणाम असा झाला की 45 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. इन्फोसिसने उत्पन्न आणि नफा वाढवण्यासाठी अनैतिक मार्गाचा वापर केल्याचा आरोप एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणी एका ग्रुपने इन्फोसिसच्या संचालक मंडळा(Infosys Board)ला पत्राद्वारे माहिती दिल्याचे समजते.

इन्फोसिसने दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात सप्टेंबर महिन्यात व्हिसरब्लोअर(Whistleblower)कडून दोन तक्रारी मिळाल्या होत्या. शार्दुल अमरचंद मंगलदास प्रकरणी व्हिसरब्लोअरने केलेल्या आरोपाची स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे. इन्फोसिसमध्ये झालेल्या या कथित घोटाळ्या संदर्भात व्हिसरब्लोअरने कंपनीच्या बोर्डाला 20 सप्टेंबर रोजी चिठ्ठी लिहली होती. कंपनीने फायदा आणि उत्पन्न वाढवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा वापर केल्याचे म्हटले होते. धक्कादायक म्हणजे कंपनीचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी सलिल पारेख यांचा देखील या घोटाळ्यात समावेश असल्याचे म्हटले आहे.

सलिल पारेख यांनी एका मोठ्या व्यवहारात नफा वाढवून-चढवून सांगण्यासाठी दबाव टाकल्याचे म्हटले आहे. यामुळे कंपनीचे उत्पन्न आणि नफ्या संदर्भात चुकीचे अंदाज वर्तवण्यास सांगण्यास सांगत आहेत, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे अशाच प्रकारची चिठ्ठी 27 सप्टेंबर रोजी अमेरिकेतील शेअर बाजारा नियंत्रक असलेल्या US Securities and Exchange Commission यांना देखील देण्यात आली होती. इन्फोसिसची नोंदणी अमेरिकेच्या शेअर बाजारात देखील आहे. या सर्व घटनेचा परिणाम कंपनीच्या अमेरिकेतील शेअर बाजारातील कामगिरीवर झाला होता. अमेरिकेतील शेअर बाजारात इन्फोसिसचे शेअर 12 टक्क्यांनी घसरले होते. अमेरिकेपाठोपाठ मंगळवारी सकाळी इन्फोसिसचे भारतीय शेअर बाजारातील शेअर 15 टक्क्यांनी कोसळले.

इन्फोसिसच्या शेअरमध्ये गेल्या 6 वर्षात आलेली ही सर्वात मोठी घसरण आहे. याआधी एका दिवसात कंपनीच्या शेअरमध्ये इतकी मोठी घट झाली नव्हती. या घसरणीमुळे कंपनीचे मार्केट कॅप 3.28 लाख कोटीवरून 2.83 लाख कोटींवर पोहोचले आहे.

गुंतवणुकदारांनी काय करावे?

इन्फोसिसमधील या घटनांचा परिणाम दिर्घकाळ दिसणार नाही. कारण त्या अर्थाने घोटाळा झालेला नाही. जर तुमच्याकडे इन्फोसिसचे शेअर असतील तर ते न विकता तसेच होल्ड करून ठेवावेत. तसेच इन्फोसिसचे शेअर नव्याने खरेदी करू नयेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 03:01 PM IST

ताज्या बातम्या