Home /News /national /

Antinational? हे तर सणकी आणि मूर्ख विचार! 'पांचजन्य'मधील टीकेवर INFOSYS चं खरमरीत प्रत्युत्तर

Antinational? हे तर सणकी आणि मूर्ख विचार! 'पांचजन्य'मधील टीकेवर INFOSYS चं खरमरीत प्रत्युत्तर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारांवर चालणाऱ्या पांचजन्य (Panchjanya) या वृत्तपत्रातील लेखावर (Article) इन्फोसिसनं (Infosys) जहाल प्रत्युत्तर (Reply) दिलं आहे.

    बंगळुरू, 6 सप्टेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारांवर चालणाऱ्या पांचजन्य (Panchjanya) या वृत्तपत्रातील लेखावर (Article) इन्फोसिसनं (Infosys) जहाल प्रत्युत्तर (Reply) दिलं आहे. या लेखात इन्फोसिसवर टीका करण्यात आली होती. इन्फोसिस ही देशविरोधी शक्तींशी संधान साधणारी कंपनी असून तुकडे-तुकडे गँगची सदस्य असल्याचा आरोप पांचजन्यमध्ये करण्यात आला होता. याला इन्फोसिसचे माजी सीएफओ टी. व्ही. मोहनदास पै यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. इन्फोसिसचं प्रत्युत्तर हा लेख काही माथेफिरू विचारांच्या मंडळींकडून लिहिण्यात आला असून इन्फोसिस कंपनी ही नेहमीच देशहिताच्या बाजूने उभी राहिली आहे. जर पोर्टलने अपेक्षित सेवा दिली नसेल, तर त्याबाबत टीका होणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र कामाच्या बाबतीतला राग मनात धरून संस्थेच्या देशप्रेमावर शंका घेणे किंवा त्यांच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप करणे हे मूर्खपणाचे लक्षण असल्याचं इन्फोसिसनं म्हटलं आहे. इन्फोसिसवर कुठल्याही कटाचा भाग असल्याचा आरोप करणं, भारतीय अर्थव्यवस्थेला जाणीवपूर्वक अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करणं हे प्रकार मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीच करू शकतात, असा पलटवार इन्फोसिसनं केला आहे. काय आहे प्रकरण? केंद्र सरकारनं जीएसटी आणि इन्कम टॅक्स पोर्टलची जबाबदारी इन्फोसिसकडे दिली होती. मात्र त्यांच्या सेवेत काही त्रुटी आढळल्यामुळे कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. यावरून ‘पांचजन्य’ने इन्फोसिसवर थेट देशद्रोही असल्याचाच आरोप केला आहे. इन्फोसिस ही कंपनी नक्षलवादी, डावे आणि तुकडे तुकडे गँगचा भाग असल्याचा दावा या वृत्तपत्राने केला होता. त्यावरून ‘पांचजन्य’वर चहूबाजूंनी जोरदार टीका झाली होती. हे वाचा - BREAKING: अफगाणिस्तानचा शेवटचा बुर्जही ढासळला; तालिबानचा पंजशीरवर पूर्णपणे ताबा संघाने केले हात वर पांचजन्यमधील भूमिकेशी आपण सहमत नसून ते संघाचं वैयक्तिक लेखकाचं वैयक्तिक मत असल्याची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतली होती. इन्फोसिसनं भारताच्या प्रगतीत मोलाचं योगदान दिलं असून त्यांच्या कामाबाबत काही आक्षेप असू शकतात, असं म्हटलं होतं. मात्र त्यामुळे कंपनीच्या देशप्रेमावर संशय घेणं चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात आलं होतं.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Income tax, RSS

    पुढील बातम्या