नवी दिल्ली, 05 सप्टेंबर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं (RSS)पहिल्यांदाच कॉर्पोरेट ब्रँडवर देशविरोधी शक्तींशी (Anti-National Forces)संबंध असल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. बंगळुरु स्थित आयटी कंपनी इन्फोसिसच्या (Infosys) माध्यमातून वस्तू आणि सेवा कर (GST) आणि आयकर पोर्टलमधील त्रुटी संबंधित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक पांचजन्य (Panchajanya) साप्ताहिक मासिकामध्ये शंका उपस्थित करण्यात आली आहे.
कोणतीही 'राष्ट्रविरोधी शक्ती' याद्वारे भारताचे आर्थिक हितसंबंध दुखावण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल या साप्ताहिक मासिकामध्ये RSSनं सवाल उपस्थित केला आहे. तसंच इन्फोसिसवर या मासिकाद्वारे नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत, असंही पांचजन्यमध्ये म्हटलं आहे.
इन्फोसिस कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका या साप्ताहिकामध्ये उपस्थित करण्यात आली आहे.
IND vs ENG : सचिन-सेहवाग नाही तर शतकांच्या 'या' विक्रमामध्ये रोहित आहे नंबर 1
आत्तापर्यंत RSSकडून असे आरोप किंवा टीका विशिष्ट व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा त्याचे कार्यकर्ते आणि विशिष्ट संघटनेच्या काही विभागांवर करण्यात आली आहे. मात्र एखाद्या कॉर्पोरेट कंपनीवर एवढा मोठा आरोप करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे.
ताज्या आवृत्तीत, 'पांचजन्य' ने इन्फोसिसची 'साख और अघात नावाची चार पानांची कव्हर स्टोरी प्रकाशित केली आहे आणि कव्हर पेजवर त्याचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे फोटो आहे. उँची उडान, फिका पकवान, अशी टीकाही या लेखात करण्यात आली आहे.
'लोकांसाठी Nude होणं मला आवडतं'; PPT द्वारे मुलीनं आई वडिलांकडे केला Secret जॉबचा खुलासा, पाहा VIDEO
वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक त्रुटींच्या अनुषंगानं देखीलही टीका करण्यात आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला मुद्दामहून अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असा आरोपही करण्यात आला आहे.
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.