Home /News /national /

जावई माझा भला, नारायण मूर्तींचे जावई ऋषी सुनाक बनले ब्रिटनचे अर्थमंत्री

जावई माझा भला, नारायण मूर्तींचे जावई ऋषी सुनाक बनले ब्रिटनचे अर्थमंत्री

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांची युनायटेड किंगडमच्या अर्थमंत्रिपदी निवड झालीय. ऋषी सुनाक हे नारायणमूर्तींची मुलगी अक्षता मूर्ती यांचे पती आहेत.

    मुंबई, 13 फेब्रुवारी : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांची युनायटेड किंगडमच्या अर्थमंत्रिपदी निवड झालीय. ऋषी सुनाक हे नारायणमूर्तींची मुलगी अक्षता मूर्ती यांचे पती आहेत. सुनाक यांची 2014 मध्ये नॉर्थ यॉर्कशायरमधल्या रिचमंडमध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते विल्यम हेग यांनी खासदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुनाक यांची निवड झाली होती. ऋषी सुनाक यांनी गोल्डमन सॅशे या इनव्हेस्टमेंट बँकिंग फर्ममध्ये अ‍ॅनॅलिस्ट म्हणून काम केलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ऋषी सुनाक यांची अर्थमंत्रिपदी नियुक्ती केली. UK Prime Minister ✔ @10DowningStreet The Rt Hon Rishi Sunak MP @RishiSunak has been appointed Chancellor of the Exchequer @HMTreasury ऋषी सुनाक 39 वर्षांचे आहेत. नारायणमूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती आणि त्यांचं 2009 मध्ये लग्न झालं. त्यांना 2 मुली आहेत. सुनाक यांचा जन्म हँपशायरच्या साउदॅम्प्टनमधला. त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थसास्त्राचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमधून MBA केलं. (हेही वाचा : 'व्हॅलेंटाइन डे' : रतन टाटांनी सांगितली त्यांची लव्ह स्टोरी, चीनमुळे तुटलं नातं) ऋषी सुनाक आणि अक्षता मूर्ती एकमेकांना स्टॅनफर्डमध्येच भेटले.ऋषी सुनाक यांचे वडील डॉक्टर होते आणि आई औषधांचं दुकान चालवत असे. त्यांनी शिक्षणासाठी आणि करिअर घडवताना मोठा संघर्ष केला. राजकीय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी सुनाक यांनी बँकिंगमध्ये करिअर केलं. ते नारायणमूर्तींची इनव्हेस्टमेंट कंपनी असलेल्या कॅटॅमरान व्हेंचर्सचे संचालकही आहेत. ब्रेक्झिटचे समर्थक ऋषी सुनाक हे पहिल्यापासूनच ब्रेक्झिटचे समर्थक आहेत. 2016 मध्ये ब्रेक्झिटसाठी घेतलेल्या सार्वमतालाही त्यांनी पाठिंबा दिला होता. युरोपियन युनियनमधून ब्रिटनने बाहेर पडावं याच मताचे ते होते. त्यांच्या या धोरणांमुळेच त्यांची अर्थमंत्रिपदी निवड झाली असावी, असं म्हटलं जातं. ऋषी सुनाक यांनी ब्रिटनच्या माजी पंतप्रधान थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट कराराच्या बाजूने मतदान केलं होतं. पण थेरेसा मे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी बोरिस जॉन्सन यांच्या धोरणांना पाठिंबा दिला. ============================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    पुढील बातम्या