मुंबई, 29 जानेवारी : देशातील सर्वात मोठे उद्योगपती रतन टाटा यांना TiECON मुंबई 2020 लाईफ टाइम अचिवमेंट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. भारतातील कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आपलं वेगळं वलय निर्माण करणाऱ्या इन्फोसिस कंपनीचे को फाऊंडर एन. आर. नारायण मूर्ती यांच्या हस्ते जेष्ठ उद्योजक रतन टाटा यांचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रदान केल्यानंतर नारायण मूर्ती यांनी चक्क व्यासपीठावर रतन टाटा यांचे आशीर्वाद घेतले. TiECON पुरस्कार वितरण समारोहात यावेळी रतन टाटा यांनी उद्योजकांना इशारा दिला आहे. जे उद्योजक पैसे बुडवून जात आहेत त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही. जुने व्यवसाय हळू हळू मागे पडत आहेत. त्यामुळे नवीन उद्योग आणि युवा फाउंडर इंडियन बिजनेसचं भविष्य उज्ज्वल असणार आहे.
पैसे बुडवणाऱ्यांना दुसरी किंवा तिसरी संधी मिळणार नाही
ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडीलमध्ये पैसे गुंतवणाऱ्या रतन टाटा यांनी उद्योजकांना मोलाचा सल्ला दिला आहे. स्टार्टअपसाठी योग्य मार्गदर्शन, सल्ला आणि नेटवर्किंग असणं आवश्यक आहे. जर व्यवसायिक किंवा गुंतवणूकदारानं पैसे बुडवले तर त्यांना कोणतीही संधी पुन्हा मिळणार नाही. बँका आणि पेन्शन फंड यांनीही स्टार्टअपसाठी गुंतवणूक करावी असं आवाहन यावेळी इन्फोसिसचे को- फाऊंडर नारायणमूर्ती यांनी केली आहे. केवळ निवडक गुंतवणूकदारांच्या आधारावर स्टार्टअप्ससाठी एक सकारात्मक वातावरण तयार केले जाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी आणखी निधी उभा करायचा असेल तर पेन्शन फंड आणि बँकांना गुंतवणूकीसाठी पुढे यावे लागेल. असंही नारायणमूर्ती यांनी यावेळी सांगितलं
सोशल मीडियावर ह्या व्हिडिओची होतेय तुफान चर्चा
हेही वाचा-नोकरी सोडली आणि सुरू केला 'हा' नवा स्टार्टअप, काही वर्षांतच झाला करोडपती
नारायण मूर्तींनी रतन टाटा यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर तो फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओचं कौतुक होत आहे. एका युझर्ननं लिहिले आहे की हे एक अतिशय सुंदर दृश्य आहे. व्यवसाय आणि संस्कृतीचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले गेले आहे.त्याच वेळी काही युझर्सनी या क्षणाचे वर्णन या सर्वोत्कृष्ट फोटो म्हणून केले आहे.
कोण आहेत नारायण मूर्ती तुम्हाला माहीत आहेत का?
नागवारा रामराव नारायण मूर्ती असं त्यांचं पूर्ण नाव. त्यांचा जन्म 20 ऑगस्ट 1946 रोजी शिडलाघाट्टा, चिक्काबालापुरा जिल्हा, कर्नाटक येथे झाला. नारायण मूर्तीचा जन्म दक्षिण भारतातील एका अत्यंत साध्या कुटुंबात झाला होता. शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनियरींगची पदवी मिळवली आणि आयआयटी कानपूर येथून एमटेक केले. इंजिनियरींगचा अभ्यास करत असताना नारायण मूर्ती यांना अनेक प्रकारच्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. नारायण मूर्ती यांना डॉ. कृष्णमूर्ती यांनी या कठीण परिस्थितीत खूप मदत केली. इन्फोसिस सुरू होण्यापूर्वी नारायण मूर्ती आयआयएम अहमदाबाद येथे चीफ सिस्टम प्रोग्रामर होते. यानंतर त्यांनी 'सॉफ्ट्रानिक्स' नावाची कंपनी सुरू केली. पण त्या अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर नारायण मूर्ती यांनी 1981 मध्ये 6 लोकांसह इन्फोसिस सुरू केली. त्यांनी पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून दहा हजार रुपये घेऊन इन्फोसिसची सुरूवात केली. नारायण मूर्ती 1981-2002 पर्यंत इन्फोसिसचे सीईओ होते. नास्कडॅकच्या यादीत समाविष्ट होणारी ही पहिली भारतीय कंपनी आहे.
हेही वाचा-मोदींनंतर Man v/s Wild मध्ये रजनीकांत, भयानक जंगलात ग्रिल सोबत असताना झाला अपघात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.