अन्नधान्याच्या किंमती वाढल्या, गेल्या 7 महिन्यातली सगळ्यात जास्त महागाई

अन्नधान्याच्या किंमती वाढल्या, गेल्या 7 महिन्यातली सगळ्यात जास्त महागाई

सामान्य माणसाला पुन्हा एकदा महागाईची झळ बसायला लागली आहे. देशभरात अन्नधान्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 7 महिन्यांतले हे सगळ्यात जास्त दर आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 जून : सामान्य माणसाला पुन्हा एकदा महागाईची झळ बसायला लागली आहे. देशभरात अन्नधान्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 7 महिन्यांतले हे सगळ्यात जास्त दर आहेत. त्यामुळे ग्राहक मूल्य निर्देशांक 2.92 टक्क्यांवरून 3.05 टक्क्यांवर गेला आहे. दिल्लीच्या घाऊक बाजारात तुरीच्या डाळीची किंमत 100 ते 120 रुपये किलोवर गेली आहे.

तुरीच्या डाळीचं उत्पादन कमी झाल्यामुळे या किंमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर तुरीची निर्यातही वाढली आहे. त्यामुळेही या किंमती वाढल्या असतील, असं सांगितलं जातं.

तुरीच्या दरवाढीची चौकशी होणार

सरकारने आफ्रिकेतल्या मोझाम्बिक देशातून 1. 75 लाख टन तूरडाळ आयात करण्याची परवानगी दिली आहे. सध्या देशभरात 14 लाख टनांचा बफर स्टॉक आहे. तरीही किंमती का वाढत आहेत,याची चौकशी केली जाणार आहे.

याआधी 2015 मध्ये तूरडाळीचा दर 200 रुपये किलोवर गेला होता. केवळ तूरडाळच नाही तर सगळ्याच अन्नधान्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

औद्योगिक उत्पादनात वाढ

महागाई वाढली असली तरी औद्योगिक उत्पादनाच्या आघाडीवर मात्र चांगली बातमी आहे. औद्योगिक उत्पादनाचा दर 0.1 वरून 3.4 टक्क्यांवर गेला आहे. औद्योगिक उत्पादनाचा दर वाढल्यामुळे याचा देशाच्या आर्थिक प्रगतीवर चांगला परिणाम होईल.

खाद्यपदार्थ आणि भाज्यांच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यामुळे महागाईचा दरही चढा आहे. याउलट कपडे आणि बुटांच्या किंमतीत घट झाली आहे. ही महागाई 2 टक्क्यांवर 1.8 टक्क्यांवर आली आहे.

पाऊस वेळेवर आला तर दिलासा

यावर्षी चांगला पाऊस पडला तर शेतीचं उत्पादन वाढेल आणि वाढत्या महागाईतून काहिसा दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे. पण तोपर्यंत ही महागाई कमी करणं हे मोदी सरकारसमोरही मोठं आव्हान आहे.

============================================================================================

काश्मीरमध्ये CRPF जवानांवर आत्मघातकी हल्ला, दहशतवाद्यांशी चकमकीचा पहिला VIDEO

First Published: Jun 12, 2019 09:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading