भारताशी व्यापार बंद करणं पाकिस्तानला पडलं महाग, ईद साजरी करायलाही नाहीत पैसे

भारताशी व्यापार बंद करणं पाकिस्तानला पडलं महाग, ईद साजरी करायलाही नाहीत पैसे

एरव्ही ईदच्या निमित्ताने पाकिस्तानची बाजारपेठ गजबजलेली असते पण लोकांकडे पैसेच नसल्यामुळे ईदच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलं. पाकिस्तानमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव खूपच वाढले आहेत.

  • Share this:

इस्लामाबाद, 10 ऑगस्ट : भारताशी व्यापारी संबंध बंद करणं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चांगलंच भोवलं आहे. हा निर्णय घेऊन पाकिस्तानने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे. यामुळे पाकिस्तानच्या मजुरांना काम मिळणंही बंद झालंय.

एरव्ही ईदच्या निमित्ताने पाकिस्तानची बाजारपेठ गजबजलेली असते पण लोकांकडे पैसेच नसल्यामुळे ईदच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलं. पाकिस्तानमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव खूपच वाढले आहेत.

पाकिस्तान आधीच महागाईच्या खाईत ढकलला गेला होता. त्यातच भारताशी व्यापार बंद केल्यामुळे ही महागाई आणखी वाढली. प्रत्येकाच्याच घराचं बजेट कोलमडलं आहे. दूध, भाजीपाला, मांसाहारी पदार्थांसाठी वाढीव पैसे मोजावे लागल्याने घराचं स्वयंपाकघर चालवायचं कसं हाच प्रश्न आहे.

सामानाची देवघेव बंद

भारत आणि पाकिस्तानमध्ये सामान घेऊन त्या बदल्यात सामानाची देवघेव करून व्यापार होत असतो. दोन्ही देशांतल्या व्यापाराची उलाढाल 3 अब्जापर्यंत जाते. ती सगळीच ठप्प आहे. दोन्ही देशांतून 35 - 35 मालवाहू ट्रक जाण्याची परवानगी होती. हे ट्रक आठवड्यातून 4 दिवस सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत सीमेच्या पलीकडे जायचे. हा व्यापार करण्यासाठी 300 व्यापाऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. या मालाच्या खरेदीचा व्यवहार पैशाने होत नाही तर वस्तूच्या बदल्यात वस्तू असा होतो.

पेट्रोलच्या दरात बदल नाही, डिझेल आणखी स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

भारतातून पाकिस्तानमध्ये कांदा, टोमॅटो सोबतच जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या जातात. आता या सगळ्याच वस्तूंची आवक बंद झाल्याने महागाईचा कहर झालाय.

ईदच्या नंतर पाकिस्तानमध्ये लग्नाचा हंगाम सुरू होतो. या लग्नसराईवरही यावेळी महागाईचा परिणाम होणार आहे. या सगळ्या परिस्थितीत पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार बंद करायला नको होता, अशी इथल्या सामान्यांची भावना आहे.

=========================================================================================

घर की तलाव कळेना, कोल्हापुरातल्या गावातील पुराची भीषणता दाखवणारा ग्राऊंड REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2019 03:19 PM IST

ताज्या बातम्या