पाकिस्तानी नागरिक महागाईनं बेहाल; जगणं महागलं

पाकिस्तानी नागरिक महागाईनं बेहाल; जगणं महागलं

पाकिस्तानमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमती या दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत.

  • Share this:

कराची, 02 मे : पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. भारतानं पाकिस्तानची नाकेबंदी करायला सुरूवात केली. त्याचा परिणाम देखील आता दिसू लागला आहे. यापूर्वी भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. पाकिस्तानी वस्तुंवरील आयात शुल्क 200 टक्के केलं. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी झाली. भारतानं उचललेल्या कठोर पावलांमुळे पाकिस्तामध्ये जीवनावश्यक वस्तुंनी उच्चांक गाठला होता. टॉमेटोनं तर पाकिस्तानी नागरिकांच्या नाकी दम करून ठेवला होता. त्यानंतर आता पाकिस्तानमधील महागाईचं वास्तव समोर आलं आहे. कारण भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये घरगुती गॅस सिलेंडर हा दुप्पट म्हणजेच तब्बल 1522.65 रूपयांनी मिळत आहे. पाकिस्तानमध्ये गॅस सिलेंडरचं वजन हे 11.8 किलोग्रॅम असतं. मागील चार महिन्यांमध्ये पाकिस्तानमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 15 रूपयांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे श्रीलंकामध्ये देखील गॅसच्या किंमती वाढल्याचं चित्र दिसून येत आहे.

‘पुलवामा हल्ला हा भाजपचा कट’; गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप

भारताच्या प्रयत्नांना यश

01 मे रोजी जैश-ए-मोहम्मदचा मोरक्या मसूद अजहर याला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. फ्रान्सच्या या ठरावाला 151 देशांनी पाठिंबा दिला. विशेष म्हणजे अजहरला दहशतवादी ठरवण्यासाठीच्या प्रस्तावाला दोन वेळा विरोध करणाऱ्या चीनने यावेळी भारताची साथ दिली.

पुलवामा हल्ल्य़ानंतर भारतानं दहशतवादाचा मुदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्यानं मांडला होता. त्याला अखेर यश मिळालं आहे. शिवाय, अमेरिकेनं देखील पाकिस्तानला तंबी दिली आहे. त्यामुळे पकिस्तानचा खरा चेहरा आता जगासमोर येताना दिसत आहे.

प्रियांका गांधींसमोर नरेंद्र मोदींबद्दल मुलांचे अपशब्द; आणि मग...

पुलवामा हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतानं पाकिस्तामधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक करत 200 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

SPECIAL REPORT : बुरखाबंदीवरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांमध्येच आता 'सामना'!

First published: May 2, 2019, 11:35 AM IST

ताज्या बातम्या