• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • सर्वोच्च न्यायालयात वकिलाहून थेट न्यायाधीश पदी 'इंदू मल्होत्रा' यांची निवड

सर्वोच्च न्यायालयात वकिलाहून थेट न्यायाधीश पदी 'इंदू मल्होत्रा' यांची निवड

सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला ठरणार आहेत.

  • Share this:
26 एप्रिल : वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला ठरणार आहेत. न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाने संमती दिली आहे. पुढील आठवड्यात इंदू मल्होत्रा शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. देशात सध्या महिला अत्याचाराने थैमान घातलं आहे. संपूर्ण वातावरणचं ढवळून निघालं आहे. पण इंदू मल्होत्रा यांच्या या कामगिरीची महिलांसाठी ही एक सकारात्मक बातमी आहे. त्यामुळे आता महिलांना योग्य तो न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. या पदावर नियुक्ती करण्यासाठी इंदू मल्होत्रा यांची फाईल तपासणीसाठी इंटेलिजन्स ब्युरोला सोपवण्यात आली होती. एखाद्या व्यक्तीची घटनात्मक पदासाठी नेमणूक करण्यापूर्वी, इंटेलिजन्स ब्युरोद्वारा त्यांची व्यावसायिक क्षमता आणि वैयक्तिक एकात्मता तपासली जाते. या व्यतिरिक्त, आयईबी देखील त्यांच्या विरोधात आरोपांची चौकशी आणि सत्यता तापासून सरकारला अहवाल देते. संपूर्ण तपासणीनंतर, आयईबीकडून इंदू मल्होत्रा यांची फाईल कायदा मंत्रालयाकडे पाठवण्यात आली आणि नंतर पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर मंत्रालयानेदेखील या पदावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, महाविद्यालयाने तीन महिन्यांपूर्वीच उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूती केएम जोसेफ आणि ज्येष्ठ वकील इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याचं सुचवलं होतं. पण जोसेफ यांच्या नियुक्तीवर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण इंदू मल्होत्रा यांची न्यायाधीश पदी निवड झाल्यामुळे सर्व स्तरांवरून त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडतोय.  
First published: