इंदूरमधील वीर सावरकरांच्या पोस्टरची देशभर चर्चा; पोस्टरवर म्हटलंय...

इंदूरमधील वीर सावरकरांच्या पोस्टरची देशभर चर्चा; पोस्टरवर म्हटलंय...

इंदूर शहरात लागलेले पोस्टर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत.

  • Share this:

इंदूर, 19 ऑक्टोबर: महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यातील सत्ताधारी भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न (Bharat Ratna)देण्यासाठी राज्य सरकार पाठपुरावा करणार असे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर सावरकर चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा वीर सावरकर चर्चेत आले आहेत. पण यावेळी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे मध्य प्रदेश(Madhya Pradesh)मधील इंदूर शहरात लागलेले पोस्टर आहेत. इंदूर शहरात लागलेले पोस्टर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत.

इंदूर शहरातील एका चौकात सावरकर यांच्या संदर्भात पोस्टर लागले आहेत. या पोस्टरमध्ये असे लिहण्यात आले आहे की, वीर सावरकर यांनी इंग्रजांकडे माफी मागितली होती. ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार हे पोस्टर इंदूरमधील एका स्थानिक काँग्रेस नेत्याकडून लावण्यात आले आहेत. शहरातील एका मुख्य चौकात लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये वीर सावरकर यांनी इंग्रजांकडून माफी मागितली होती. वृत्तानुसार पोस्टरवर सावरकर यांनी दिलेल्या कथीत माफी नामा देखील छापण्यात आला आहे. या पोस्टरवर ते लावणाऱ्यांची नावे देखील लिहण्यात आली असून त्यात काँग्रेसचे नेते विवेक खंडेवाल आणि गिरीष जोशी यांची नावे लिहण्यात आली आहेत.

महाराष्ट्रातील भाजपने सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी पाठपूरावा करू असे आश्वासन दिल्यानंतर इंदूर शहरात हे पोस्टर लागले आहेत. भाजपच्या महाराष्ट्र विभागाकडून 15 ऑक्टोबर रोजी राज्य विधानसभेसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. या जाहीरनाम्यात अन्य आश्वासनासह विनायक दामोदर सावरकर यांना देशातील सर्वोच्च सन्मान भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकार पाठपूरावा करणार असे आश्वासन देण्यात आले होते. याच बरोबर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देखील भारतरत्न देण्यासाठी सरकार पाठपूरावा करेल अशी म्हटले होते.

महाराष्ट्र भाजपने सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपूरावा करू असे म्हटले आहे. अर्थात सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी असे आश्वासन देण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी 2002मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेजी यांनी देखील सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती.

First published: October 19, 2019, 1:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading