इंदूर, 13 जून : आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्यावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भैय्यूजी महाराज यांचं पार्थिव त्यांच्या घराकडून आश्रम दाखल झालं आहे. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनाकरता त्यांच्या सुर्योदय आश्रमात सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत ठेवण्यात आलं. नंतर दुपारी 1.30 वाजता अंत्ययात्रेला सुरवात झाली.
कौटुंबिक सुत्रांच्या माहितीनुसार भैय्यूजी महाराज यांना त्यांची मुलगी मुखाग्नी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भय्यूजी महाराज यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक राजकीय नेते इंदूरमध्ये दाखल झाले आहेत.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले, श्रीकांत भारती, औरंगाबाद खासदार चंद्रकांत खैरे आणि अन्य नेते इंदूरमध्ये दाखल झाले आहेत. त्याचसोबत त्यांची पत्नी, मुलगी हे देखील आश्रमात दाखल झाले आहेत.
Loading...Indore: Supporters mourn as mortal remains of spiritual leader Bhaiyyuji Maharaj are being taken to his native village. He had allegedly committed suicide after shooting himself at his residence yesterday. #MadhyaPradesh pic.twitter.com/gEBFOcpgZZ
— ANI (@ANI) June 13, 2018
मेघदूत मुक्तिधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराला त्यांचे हजारो अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं तयारी सुरू केलीय. अनुयायांसोबतच अनेक राजकीय नेतेही महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इंदूरमध्ये येण्याची शक्यता आहे.
भय्यूजी महाराज त्यांच्या राहत्या घरीच डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ते 50 वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून ते निराशेच्या अवस्थेत होते अशीही माहिती आहे. त्या निराशेतूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेश सरकारनं राज्यातल्या विविध संत मंडळींना मंत्रीपदाचा दर्जादिला होता त्यात भय्यूजी महाराज यांचाही समावेश होता.
मॉडेलिंग ते आध्यात्मिक गुरू असा त्यांचा चढता आलेख होता. 1968 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. सर्वच पक्षांमधल्या राजकारण्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. विविध आंदोलनांमध्ये मध्यस्त्याची भूमिकाही त्यांनी निभावली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा