मराठी बातम्या /बातम्या /देश /जगातील सर्वात महागडे दुकान, प्रसादाच्या दुकानासाठी लागली कोट्यावधींची बोली!

जगातील सर्वात महागडे दुकान, प्रसादाच्या दुकानासाठी लागली कोट्यावधींची बोली!

जगातील सर्वात महागड्या दुकानाचा फोटो

जगातील सर्वात महागड्या दुकानाचा फोटो

एखाद्या घरासाठी किंवा जागेसाठी मोठी बोली लागल्याचं आपण पाहिलं आहे. पण गणेश मंदिराजवळील एका प्रसादाच्या दुकानाचा 1.72 कोटी रुपयांना लिलाव झालाय.

 • Local18
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 8 फेब्रुवारी : एखाद्या घरासाठी किंवा जागेसाठी मोठी बोली लागल्याचं आपण पाहिलं आहे. पण गणेश मंदिराजवळील एका प्रसादाच्या दुकानाचा 1.72 कोटी रुपयांना लिलाव झाल्यानं त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रसाद दुकानाचा एवढा महागडा लिलाव ऐकून मोठमोठे व्यापारीही थक्क झाले आहेत. केवळ 70 स्क्वेअर फुटांच्या या दुकानाची किंमत एक कोटी 72 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

  सर्वात महागडे दुकान

  मध्य प्रदेशातील इंदूरमधील प्रसिद्ध खजराना गणेश मंदिराजवळच्या दुकानासाठी ही बोली लागलीय. इंदूर ही मध्य प्रदेश राज्याची औद्योगिक राजधानी आहे. त्यामुळे अनेकजण येथे गुंतवणूक करण्यास इच्छुक असतात. इंदूरमध्ये प्रॉपर्टीत गुंतवणूक केली की, त्यातून भरपूर नफा मिळण्याची शक्यता असते. प्रसादाचं दुकान खरेदी केलेल्या दुकानाचे मालक दीपक राठोड असून त्यांनी असा दावा केला आहे की, हे जगातील सर्वांत महागडं प्रसादाचं दुकान आहे. त्यांनी दुकानावरही असं पत्रकही चिकटवलं आहे.

  खजराना गणेश व्यवस्थापन समिती (मंदिर ट्रस्ट) दुकानाच्या बोलीतून मिळालेली रक्कम मंदिराच्या कामात आणि विस्तारीकरणात गुंतवणार आहे. प्रसिद्ध खजराना गणेश मंदिर परिसरातील या दुकानासाठी अनेकांनी निविदा भरल्या होत्या. मात्र, बोलीची किंमत जास्त असल्यानं अनेकांची निराशा झाली. आयडीएनं गेल्या ऑक्टोबर महिन्यात खजराना गणेश मंदिराच्या दुकानांची निविदा काढली होती. आता दुकानाची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

  मंदिरात नारळ फोडल्यानंतर वाया जाणार नाही पाणी! पाहा लय भारी आयडिया, Video

  का आहे इतकी किंमत?

  इंदूरमधील खजराना गणेशावर अनेकांची श्रद्धा आहे. श्रीगणेशाच्या दर्शनासाठी इंदूरसह दूरवरून लोक येथे येतात. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची गर्दी उसळते. या ठिकाणी असलेल्या प्रसादाच्या दुकानदारांचाही चांगला व्यवसाय होतो. त्यामुळेच येथे दुकानांसाठी जागा मिळवण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागते.

  प्रसादाचं दुकान खरेदी केलेल्या दुकानाचे मालक दीपक राठोड असून ते खजराना गावातील रहिवासी आहेत. त्यांच्या अनेक पिढ्या मंदिरात प्रसादाचे लाडू विकत आहेत. त्यांची गणेशावर अपार श्रद्धा आहे. कोणत्याही किंमतीत त्यांना हे दुकान विकत घ्यायचं होतं.

  परदेशात प्रसिद्ध असलेली हिंदू मंदिरे; जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात दर्शनाला

  खजराना गणेश मंदिर राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं आहे. हे मंदिर भारतातील प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आहे. बुधवार आणि रविवारी येथे भाविकांची जास्त गर्दी असते. स्थानिक मान्यतेनुसार या मंदिरात पूजा केल्यानं भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या मंदिरातील मुख्य उत्सव ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील विनायकी चतुर्थीला असतो.

  First published:

  Tags: Local18, Madhya pradesh