मध्य प्रदेशातल्या 'हनी ट्रॅप'चं 'हे' आहे महाराष्ट्र कनेक्शन, काँग्रेसचा नेता जमवतोय पुरावे!

मध्य प्रदेशातल्या 'हनी ट्रॅप'चं 'हे' आहे महाराष्ट्र कनेक्शन, काँग्रेसचा नेता जमवतोय पुरावे!

मध्य प्रदेशातल्या काही युवतींनी आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अनेक नेते, अधिकारी आणि बड्या लोकांना गोवलं आणि त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळले.

  • Share this:

भोपाळ 25 सप्टेंबर : मध्य प्रदेशच्या राजकारणात (madhya pradesh) हनी ट्रैपमुळे (Honey trap)मुळे खळबळ उडालीय. आता या प्रकरणाचं महाराष्ट्र (Maharashtra) कनेक्शन उडकीस आलंय. या प्रकरणाचे धागेदोरे उघडकीस आले तर निवडणुकीच्या तोंडावर खळबळ उघडण्याची शक्यता आहे. यात नेत्यांचाहा सहभाग असल्याने लातूर काँग्रेसचा (congress leader) एक नेता आपल्या विरोधकांचे पुरावे शोधण्यासाठी मध्य प्रदेशात दाखल जालाय. त्यामुळे अनेक नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या घटनेचे तार व्यापक असल्याने यात अनेकांची नावं पुढं येण्याची शक्यता आहे.

Mob Lynching : रस्त्यावर शौचास बसल्यामुळे दोन दलित मुलांची समूहाने केली हत्या

पुरावे गोळा करण्यासाठी लातूर काँग्रेसचे नेते अभय साळुंके हे इंदूरमध्ये पोहोचले असून ते संशयीत मुलीला भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याबरोबर त्यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या मदतीने पोलीस स्टेशनमधूनही माहिती घेतलीय. या प्रकरणात महाराष्ट्रातल्या एका भाजपच्या मंत्र्यांचं नावही मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं जाहीर केलंय.  त्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे.

धक्कादायक! मानेला दोरी बांधून तरुणाला नेलं फरफटत,15 किमी दूर रक्ताचे ओघळ

मध्य प्रदेशातल्या काही युवतींनी आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अनेक नेते, अधिकारी आणि बड्या लोकांना गोवलं आणि त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने एका विशेष पथकाची स्थापना करून चौकशी सुरू केलीय. आणि काही लोकांना अटकही केलीय. त्यामुळे या प्रकरणात जसे खुलासे होतील तशी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात या प्रकरणाचे धागेधोरे पुढे आले असून आणखी अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 25, 2019, 7:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading