भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात टि्वस्ट, अनुयायांनी केली सीबीआय चौकशीची मागणी

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात टि्वस्ट, अनुयायांनी केली सीबीआय चौकशीची मागणी

तसंच या अनुयायांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्हं निर्माण केले आहे.

  • Share this:

इंदूर, 03 डिसेंबर : भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावी अशी मागणी केली आहे. भय्यू महाराज यांच्या अनुयायांनी इंदूर डीआयजी हरिनारायण यांच्याकडे याबद्दल निवेदन दिलं आहे. तसंच या अनुयायांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्हं निर्माण केले आहे.

भय्यू महाराज यांच्या अनुयायांनी आरोप केला आहे की, आत्महत्या प्रकरणाचा पोलीस व्यवस्थितीत तपास करत नाही. या प्रकरणाचे असे काही धागे आहेत त्याचा पोलीस शोध घेत नाही. अनुयायांसोबत अन्य काही लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले नाही.

भय्यू महाराज यांचे अनुयायांनी यावेळी भारत सरकारकडून मिळालेलं पत्रही घेऊन आले होते. हे पत्र मध्य प्रदेश सरकारच्या प्रमुख सचिवांना लिहिलं होतं. यात सीबीआय चौकशीसाठी मागणी केली होती. भय्यू महाराज यांचे अनुयायी मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात येथील वेगवेगळ्या ठिकाणाहुन पोहोचले आहे.

भय्यू महाराज यांच्या अनुयायांनी दिलेले निवेदन हे राज्य सरकारपर्यंत पोहोचवणार असल्याचं आश्वासन डीआयजी हरिनारायण चारी मिश्र यांनी दिलं. सोबत पोलिसांना सीबीआय तपासामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. ज्याची मागणी अनुयायांनी केली आहे ती माहिती पुढे दिली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

भय्यू महाराज यांनी आत्महत्या केल्यानंतर सुर्योदय आश्रमाच्या संपत्तीवरुन वाद निर्माण झाला आहे. ट्रस्टमध्ये काही गट तयार झाले आहे. भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी अनुयायी आले होते तेव्हा महाराजांचा विश्वासू सेवक विनायक उपस्थितीत नव्हता. असं सांगितलं जातंय की, विनायककडे सर्व अधिकार दिल्यानंतर तो इंदूरमध्ये राहत नाही.

======================

First published: December 3, 2018, 4:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading