S M L

पाच रुपयांसाठी बेदम मारहाण करून शेतकऱ्याचा खून

Sachin Salve | Updated On: Jun 11, 2018 08:39 PM IST

पाच रुपयांसाठी बेदम मारहाण करून शेतकऱ्याचा खून

मध्यप्रदेश, 11 जून : मध्यप्रदेशची राजधानी इंदौरमध्ये फक्त पाच रुपयांसाठी एका शेतकऱ्याला मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना घडलीये. एका ढाब्यावर जेवणाच्या बिल देण्यास पाच रुपये कमी असल्यामुळे या शेतकऱ्याची ढाबाचालकाने केलेल्या मारहाणातील शेतकऱ्याचा मृत्यू झालाय.

इंदौर जवळील सिमरोल इथं ही घटना घडलीये. धमेंद्र नावाच्या शेतकऱ्याने जेवणानंतर ढाब्यावरून 5 रुपयांचा पाण्याचा पाऊच विकत घेतला होता. पण त्याच्याकडे 5 रुपये देण्यासाठी नव्हते या कारणावरून ढाबाचालक सतीशसोबत वाद झाला. या वादानंतर सतीश आणि त्याच्या भावाने धमेंद्र यांना मारहाण केली आणि ढाब्यातून बाहेर फेकून दिलं.

मारहाणीनंतर धमेंद्र घरी आले असता अचानक प्रकृती खालावली. तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डाॅक्टारांनी मृत घोषित केलं. धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांनी याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली असून ढाबा चालकाच्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा आरोप केलाय.



पोलिसांनी धर्मेंद्र यांचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठ पाठवला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2018 08:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close