Home /News /national /

पाईपवर चढून गर्लफ्रेंडला भेटायला गेला डॉक्टर, चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू

पाईपवर चढून गर्लफ्रेंडला भेटायला गेला डॉक्टर, चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेलेल्या या तरूण डॉक्टरला त्याचे प्राण गमवावे लागले आहेत. तिला भेटण्यासाठी पाईपवर चढल्यानंतर चौथ्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला.

    इंदौर, 14 जून : प्रेमासाठी काही लोकं वाटेल ते करण्यासाठी तयार होतात. काहीजण त्यामध्ये यशस्वी होतात, पण काहीजण त्यांचे सर्वस्व गमावून बसतात. असाच काहीसा प्रकार इंदौरमधील एका डॉक्टरबरोबर घडला आहे. गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेलेल्या या तरूण डॉक्टरला त्याचे प्राण गमवावे लागले आहेत. आयुष शर्मा हा 24 वर्षीय डॉक्टर इंडेक्स मेडिकल महाविद्यालयाच्या मुलींच्या वस्तीगृहामध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जात होता. त्यासाठी त्याने पाईप्सचा वापर केला. पाईपवर चढल्यानंतर चौथ्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त दैनिक भास्करने प्रसिद्ध केले आहे. आयुषने याच महाविद्यालयामध्ये एमबीबीएसची पदवी घेतली होती आणि आता त्याची इंटर्नशीप सुरू होती. त्याची गर्लफ्रेंड देखील इंटर्नशीप करत होती, काही दिवसांपूर्वीच ती गावाहून हॉस्टेलवर परतली होती. (हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळात सोने कर्ज ठरेल सोयीचं, बँक आणि ग्राहकांना होणार फायदा) आयुषची प्रेयसी गावावरून परतल्यानंतर तो तिला भेटण्यासाठी आग्रह करत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी भेटण्याबाबत तिने विचारले असता आयुषने त्याला नकार दिला आणि तो रात्री 2.30 वाजताच तिला भेटण्यासाठी मुलीच्या वस्तीगृहापर्यंत पोहोचला. पाईपच्या साहाय्यानेच तो वस्तीगृहाच्या छतावर पोहोचला, तिथून उतरण्याचा काही पर्याय नव्हता कारण खाली जाण्यासाठीचा दरवाजा बंद होता. शेवटी त्याने प्लास्टिक पाईपच्या मदतीने गर्लफ्रेंडच्या खोलीजवळ जाण्यास सुरुवात केली. केवळ 2 इंचाचा पाईप त्याला सांभाळू न शकल्याने तिथून पडून त्याचा मृत्यू झाला. आयुष चौथ्या मजल्यावरून कोसळला मात्र कोणालाही त्याचा आवाज ऐकू आला नाही. पाईप तुटल्यामुळे पाणी जमा झाल्याचे त्याठिकाणी असलेल्या महिला गार्डच्या लक्षात आले. तेव्हा त्यांना आयुष पडल्याचे दिसले. आयुषला खाजगी रुग्णालयात भरती केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान घडल्या प्रकाराबाबत सकाळी समजल्यानंतर आयुषची गर्लफ्रेंड धक्क्यातून सावरलेली नाही. आयुषच्या पालकांना देखील कळवण्यात आले असून त्याचा मृतदेह बैतूल जिल्ह्यातील मुळ गावी नेण्यात आला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या