भयंकर! मृत्यूनंतरही अवहेलना; रुग्णालयाच्या शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह

41 वर्षीय व्यक्तीच्या मृत शरीराचे वेगवेगळे भाग कुरतडले आहेत. शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी शनिवारी मृतदेह ताब्यात देण्याच्या वेळी ही बाब समोर आल्याचं सांगितलं.

41 वर्षीय व्यक्तीच्या मृत शरीराचे वेगवेगळे भाग कुरतडले आहेत. शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी शनिवारी मृतदेह ताब्यात देण्याच्या वेळी ही बाब समोर आल्याचं सांगितलं.

  • Share this:
    इंदूर, 19 जून : शासकीय रुग्णालयाच्या शवागारात एक मृतदेह उंदरांनी कुरतडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार, अस्वच्छता आणि अव्यवस्था समोर आली आहे. या शवागारात (District Hospital Morgue) असलेल्या 41 वर्षीय व्यक्तीच्या मृत शरीराचे वेगवेगळे भाग कुरतडले आहेत. शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी शनिवारी मृतदेह ताब्यात देण्याच्या वेळी ही बाब समोर आल्याचं सांगितलं. कृष्णकांत पांचाळ असं मृताचं नाव असून ते धार जिल्ह्यातील रहिवासी होते. शुक्रवारी विष घेतल्यानंतर त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर रात्री मृतदेह येथेच ठेवण्यात आला. रात्रीत उंदरांनी मृतदेहाचे विविध अवयव कुरतडल्याचं समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील इंदूरच्या (Indore News) जिल्हा रूग्णालयात हा निष्काळजीपणाचा प्रकार घडला. शुक्रवारी संध्याकाळी आपले काका कृष्णकांत पांचाळ यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला असल्याचे मृताचे पुतणे राहुल पांचाळ यांनी सांगितलं. परंतु, शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी शवागारामध्ये फ्रीजरदेखील नाही, असं ते म्हणाले. शवागाराच्या कर्मचार्‍यांनी आम्हाला रात्री आश्वासन दिले होते की, रात्री शरीराचे कोणतेही नुकसान होणार नाही. परंतु, शवविच्छेदनानंतर शनिवारी जेव्हा आपण मृतदेह पाहिला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर, तळहातावर, अंगठ्यावर आणि बोटांना उंदरांनी कुरतडल्याच्या ताज्या जखमा आढळल्या, असं त्यांनी सांगितलं. रुग्णालयाच्या शवगृहातील या घटनेबाबत विचारले असता सिव्हिल सर्जन डॉ. संतोष वर्मा म्हणाले की, मी मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांशी बोललो आहे. ते म्हणतात की, मृत शरीराच्या गालावर उंदरांनी कुरतडल्याच्या जखमा सापडल्या आहेत. ते म्हणाले की, जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात उंदीर व इतर प्राण्यांना प्रतिबंध करण्यासाठी खासगी एजन्सीमार्फत औषधांची नियमित फवारणी केली जाते. मृत शरीर उंदरांनी कुरतडल्याच्या प्रकरणात आम्ही या एजन्सीला नोटीस बजावून उत्तर मागवू, असं सिव्हिल सर्जन म्हणाले. हे वाचा - नाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, मात्र आरोग्य यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती? अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जिल्हा रुग्णालय पुन्हा बांधावं लागणार असून त्यासाठी जुन्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. तथापि, अद्याप जुन्या इमारतीत रुग्णालयाचं शवगृह चालू आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा रुग्णालय आवारात जवळपासची अनेक बांधकामे कोसळल्यामुळं शवगृहाच्या सर्व बाजूंनी मोकळं मैदान तयार झालं आहे. त्यामुळं पावसाळ्यात उंदीर व इतर प्राण्यांच्या घुसखोरीचा धोका वाढला आहे.
    Published by:News18 Desk
    First published: