Home /News /national /

कंप्यूटर बाबांच्या आश्रमात अलिशान बाथरूम, सापडल्या तलवारी आणि बंदुका

कंप्यूटर बाबांच्या आश्रमात अलिशान बाथरूम, सापडल्या तलवारी आणि बंदुका

Bhopal: Spiritual leader Namdeo Das Tyagi, popularly known as 'Computer Baba' and was given Minister of State status by the Madhya Pradesh government, after he resigned in Bhopal, Monday, Oct 1, 2018. (PTI Photo)  (PTI10_1_2018_000176B)

Bhopal: Spiritual leader Namdeo Das Tyagi, popularly known as 'Computer Baba' and was given Minister of State status by the Madhya Pradesh government, after he resigned in Bhopal, Monday, Oct 1, 2018. (PTI Photo) (PTI10_1_2018_000176B)

तलवारी आणि बंदुका नेमक्या कशासाठी आणण्यात आल्या होत्या याचा तपास आता पोलीस करत आहेत. बाबा आणि त्यांच्या 6 सहकाऱ्यांना इंदुरच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.

  भोपाळ 8 नोव्हेंबर: मध्य प्रदेशातल्या (Madhya Pradesh) कंप्युटर बाबांचा (computer baba) आश्रम धडक कारवाई करून जमीनदोस्त केल्याने राज्यातलं वातावरण तापलं आहे. काँग्रेसने ही सूडाची कारवाई असल्याचं म्हटलं आहे. याबाबांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सरकारविरुद्ध लोकशाही बचाओ यात्रा काढली होती त्यामुळे ही कारवाई केली गेली असा काँग्रेसचा आरोप आहे. या कारवाईमध्ये आश्रमात एक अलिशान बाथरूम असल्याचं आढळून आलं आहे. मोहमाये पासून दूर राहा असा संदेश देणारे बाबा या बाथरुमचा वापर करत होते. दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे या आश्रमातून काही तलवारी आणि बंदुकाही सापडल्या आहेत त्यामुळे खळबळ उडाली आहे. या तलवारी आणि बंदुका नेमक्या कशासाठी आणण्यात आल्या होत्या याचा तपास आता पोलीस करत आहेत. बाबा आणि त्यांच्या 6 सहकाऱ्यांना इंदुरच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. आपण बाबांची जेलमध्ये जाऊन भेट घेणार असल्याचं काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी म्हटलं असून त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. जिल्हा प्रशासनानं रविवारी सकाळी कंप्युटर बाबांच्या आश्रमावर धडक कारवाई केली आहे. कंप्युटर बाबांकडून करण्यात आलेलं अतिक्रमण तातडीनं हटवण्यासाठी जिल्ह्या प्रशासनानं बुलडोजर आणून कारवाई केली आहे. BIG NEWS: अखेर चीन नरमला, 6 महिन्यांपासूनची कोंडी फुटण्याची शक्यता जिल्हाधिकारी मनीष सिंह, एडीएम अजय देव शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जमुडिहाबाशी गावात नामदेव दास त्यागी (कंप्युटर बाबा) यांनी केलेले अतिक्रमण हटविले असून एडीएम अजयदेव शर्मा व अन्य एसडीएम व पोलिस अधिकाऱ्यांची टीम आज सकाळपासून कारवाई करीत आहे. कंप्युटर बाबांच्या आश्रमातील बेकायदा बांधकाम तोडण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली होती. सकाळी 8 वाजता ही कारवाई सुरू झाली आणि काही तास चालली. पालिकेनं पक्क्या बांधकामावर हातोडा घातला आहे. जिल्हा प्रशासनाने जे अतिक्रमट पाडलं आहे त्याची साधारण किंमत 80 कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. 40 एकरहून अधिक परिसरात पसरलेला या आश्रमावर पालिकेनं बुलडोजर चालवला. Kashmir: पाकिस्तानचा घुसखोरीचा डाव उधळला, 4 जवान शहीद, 2 दहशतवाद्यांचा खात्मा या ठिकाणी नेमकं काय विकास करायचा यासंदर्भात महापालिकेकडून आराखडा तयार केला आहे. एक तासाच्या कारवाईत संपूर्ण आश्रम जमीनदोस्त करण्यात आला आहे. रविवारी सकाळी गोपनीय पद्धतीनं ही कारवाई करण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून यासाठी पूर्ण नियोजन देखील करण्यात आलं होतं.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Madhya pradesh

  पुढील बातम्या