भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाला नवं वळण

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाला नवं वळण

भय्यू महाराज यांचा जुन्या ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

इंदूर, 18 डिसेंबर : आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.भय्यू महाराज यांचा जुन्या ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता त्याने भय्यू महाराजांच्या वकिलांकडे 5 कोटींची खंडणी मागण्यासाठी कट रचला होता.

भय्यू महाराज आणि त्यांची पत्नी डॉ. आयुषी यांच्या वकिलाला 5 कोटी खंडणी मागणाऱ्या टोळीला इंदूर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी जेव्हा या टोळीची चौकशी केली तेव्हा त्यांनी धक्कादायक माहिती दिली.

भय्यू महाराज यांचा जुना ड्रायव्हर कैलास या प्रकरणात सहभागी आहे. त्यानेच खंडणी मागण्यासाठी कट रचला होता. भय्यू महाराज यांच्या वकिलाकडे कोट्यवधी रूपये असल्याचा त्याला संशय होता.

भय्यू महाराज यांचा विश्वास सेवक विनायक हा 12 कोटी रूपये घेऊन फरार झाला अशी माहितीही कैलासनं दिली. विनायकनं या प्रकरणाची कुठेही वाच्यात होऊ नये म्हणून मला 2 कोटी रूपये देण्याचं आश्वासन दिलं होतं असंही या त्यानं सांगितलं. त्याच्या माहितीच्या आधारावरून पोलीस आता विनायकचा शोध घेत आहे.

एमआयजी पोलीस स्टेशनमध्ये ओल्ड पलासिया येथील राहणारे निवेश उर्फ बडजात्या यांनी 5 कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती.

बुधवारी रात्री पोलिसांनी भय्यू महाराज यांचा आधीचा ड्रायव्हर कैलास याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी चौकशी केली असती अनुराग आणि सुमित हे दोघेही या प्रकरणात सहभागी असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या तेव्हा दोघांनी धक्कादायक खुलासा केला.

भय्यू महाराज यांच्या ड्रायव्हर कैलासनेच खंडणी मागण्यासाठी कट रचला होता. त्यानंतर पोलिसांनी कैलासची जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यानं अनेक खुलासे केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलासनं भय्यू महाराज यांचा खास सेवक विनायकबद्दल पोलिसांना माहिती दिली. आश्रमाची जमा झालेली रक्कम विनायक त्याच्यासमोर घेऊन पळून गेला. या प्रकरणानंतर भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणालाही नवं वळण मिळालं.

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस या प्रकरणात एका महिलेचा शोध घेत आहे. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणात विनायक आणि या महिलेवर पोलिसांना संशय बळावला आहे.

======================

First published: December 19, 2018, 6:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading