मोतिबिंदूच्या ऑपरेशननंतर 11 जणांचे डोळे गेले; मंत्र्यांनी हात जोडून मागितली माफी!

मोतिबिंदूच्या ऑपरेशननंतर 11 जणांचे डोळे गेले; मंत्र्यांनी हात जोडून मागितली माफी!

इंदूर येथे मोतिबिंदूचे ऑपरेशन केल्यानंतर 11 जणांचे डोळे गेल्याच्या घटनेने मध्य प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

  • Share this:

इंदूर, 19 ऑगस्ट: इंदूर येथे मोतिबिंदूचे ऑपरेशन केल्यानंतर 11 जणांचे डोळे गेल्याच्या घटनेने मध्य प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. इंदूरमधील एका रुग्णालयात 8 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाअंतर्गत एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात काही रुग्णांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात आले होते. ऑपरेशननंतर ज्या रुग्णांच्या डोळ्यात औषध टाकण्यात आले, त्यांच्या डोळे गेले. या घटनेनंतर मध्य प्रदेश सरकारमधील आरोग्य मंत्री तुलसी सिलावट यांनी संबंधीत रुग्णांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आरोग्य मंत्री तुलसी सिलावट यांनी ज्या रुग्णांचे डोळे गेले, त्यांची भेट घेतली. तुलसी खाली फरशीवर बसले आणि त्यांनी रुग्णांसमोर हात जोडले व कुटुंबीयांची माफी मागितली. मंत्र्यांनी या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सात सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. यात इंदूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

काय झाले नेमके

इंदूरमधील ज्या रुग्णालयात मोतिबिंदूचे ऑपरेशन करण्यात आले होते. या ऑपरेशननंतर रुग्णांच्या डोळ्यात औषध टाकण्यात आले. या औषधामुळे इफेक्शन झाले. जेव्हा डॉक्टरांनी रुग्णांचे डोळे चेक केले तेव्हा त्यांनी काहीच दिसत नसल्याचे सांगितले. डॉक्टरांनी डोळ्यात इफेक्शन झाल्याचे मान्य केले पण त्याचे नेमके कारण सांगितले नाही. ज्या रुग्णालयात हे ऑपरेशन झाले ते एका ट्रस्टच्या मार्फत चालवले जाते. ही घटना झाल्यानंतर आरोग्य विभागाने रुग्णालयाला सील केले आहे.

राज्य सरकारमधील मंत्री जीतू पटवारी यांनी रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे. ज्या रुग्णांचे डोळे गेले आहेत त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच ज्या रुग्णांचे डोळे गेले आहेत त्यांच्यावरील उपचाराचा खर्च सरकार करणार आहे.

याआधीही झाली होती घटना

याआधी ही या रुग्णालयात ऑपरेशननंतर रुग्णांचे डोळे गेले होते. 2010मध्ये मोतिबिंदूचे ऑपरेशन झाल्यानंतर 20 जणांचे डोळे गेले होते. त्यानंतर आता पुन्हा याच रुग्णालयात अशी घटना घडली आहे.

राज ठाकरेंना ईडी नोटीस सुडबुद्धीने? मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

Published by: Akshay Shitole
First published: August 19, 2019, 5:35 PM IST
Tags: Indore

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading