18 हजार पगार घेणारा निघाला 20 कोटीचा मालक!

18 हजार पगार घेणारा निघाला 20 कोटीचा मालक!

इंदूर महानगरपालिकेत काम करणारा सर्वसाधारण कर्मचारी असलम खान हा तब्बल २० कोटीचा मालक निघालाय.

  • Share this:

इंदूर, 6 ऑगस्ट : इंदूर महानगरपालिकेत काम करणारा सर्वसाधारण कर्मचारी असलम खान हा तब्बल २० कोटीचा मालक निघालाय. इंदूरमध्ये त्याचे 5 आलीशान घर असून, त्याच्या घरात 2 किलो सोनं, 15 लाख रोख, तब्बल ५ लाखाचे बोकडं आढळून आली. याशिवाय त्याची आणखी संपत्तीचाही माहिती पोलिसांना मिळाली आहे. असलम खानच्या घरात किमती होम थियेटरही लावलेले आहे.

असलम खानच्या अशोका कॉलनील्या घरासह पाच ठिकाणी असलेल्या घरात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. देवास, महू भागातील त्याच्या जमिनी, दोन दुकाने, घरांचे दस्तएवज, लाखो रूपये किमतीचे दागीने आणि बँक खात्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

याव्यतिरीक्त एक फ्लॅट, तीन चारचाकी वाहने ज्यांमध्ये एसी लागलेले आहेत. यांत एक सेडान कार आहे आणि एक क्लासिक जीप आहे. तीन महागड्या दुचाक्या त्याच्याकडे आढळून आल्या आहेत. असलम हा महानगरपालिकेत 18 हजार रुपये पगार एसलेला एक सर्साधारण कर्मचारी आहे. मनपात सर्वसाधारण कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या असलमकडे एवढी गडगंज मालमत्ता आली कशी असा प्रश्न आता निर्माण झालाय.

अधिकाऱ्यासोबत त्याचे साटेलोटे होते त्यामुळेच त्याचं कोणि काही वाकडं करू शकला नाही अशी चर्चा आहे. यापूर्वी तो अनेकदा सस्पेंड झाला होता. पर काही दिवसांनंतर त्याला परत रूजू करून घेतले जात असे. माजी आयुक्त सी.बी. सिंह यांनी तीनदा आणि तत्कालीन कमिश्नर मनीष सिंह यांनी त्याला चौथ्यांदा सस्पेंड केलं होतं. त्यानंतर त्याला बिलावली झोन मध्ये रूजू करून घेण्यात आले. अनेक बिल्डर्स आणि ठेकेदारांशी त्याचे संबंध होते, आणि तो बांधकामाचे नकाशे पास करायचा अशी माहिती तपासात समोर आली आहे. छापे घालून त्याची संपत्ती जप्त करण्यात येत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2018 08:02 PM IST

ताज्या बातम्या