VIDEO : दरडी कोसळत असताना अमरनाथच्या भाविकांसाठी ढाल बनले जवान

अमरनाथ यात्रेतले यात्रेकरू बाबा बर्फानींच्या दर्शवनाला चालले होते तेव्हा पहाडामध्ये दरडी कोसळल्या आणि हे मोठमोठे दगड वाटेवर यायला लागले. पण भारत - तिबेट सीमा पोलीस दलातल्या या जवानांनी प्राणांची पर्वा न करता हे दगड रोखून धरले.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 07:26 PM IST

VIDEO : दरडी कोसळत असताना अमरनाथच्या भाविकांसाठी ढाल बनले जवान

श्रीनगर, 4 जुलै : अमरनाथची यात्रा 1 जुलैपासून सुरू झाली आहे. या यात्रेतल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी भारत - तिबेट सीमेवरचे पोलीस मदतीसाठी तैनात आहेत. अमरनाथ यात्रेच्या वाटेवरची बालतालमधली काही दृश्यं समोर आली आहेत.

अमरनाथ यात्रेतले यात्रेकरू बाबा बर्फानींच्या दर्शवनाला चालले होते तेव्हा पहाडामध्ये दरडी कोसळल्या आणि हे मोठमोठे दगड वाटेवर यायला लागले. पण भारत - तिबेट सीमा पोलीस दलातल्या या जवानांनी प्राणांची पर्वा न करता हे दगड रोखून धरले.

Loading...

जवानांच्या या शौर्याबद्दल सगळ्यांनीच त्यांना सलाम केला आहे. याआधीही या जवानांनी 25 यात्रेकरूंना ऑक्सिजन पुरवूनं त्यांचे प्राण वाचवले होते.

अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू झाली.या यात्रेत 4 हजार 600 पेक्षा जास्त भाविक सहभागी झाले आहेत. ज्या भाविकांना ही यात्रा करणं कठीण झालं होतं त्यांना या पोलिसांनी आपल्या छावण्यांमध्येही थांबवून घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 07:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...